ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
आषाढ कृष्ण प्रतिपदा. वर्षा ऋतू.
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
“आज उत्तम दिवस आहे.”
चंद्र नक्षत्र – श्रवण.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मकर.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)
मेष:- चंद्राचा गुरूशी त्रिकोण (शुभ) योग आहे. नोकरीत चांगले अनुभव येतील. मनासारखी कामे होतील. व्यवसाय वाढेल. मन स्थिर ठेवा.
वृषभ:- नवम स्थानी चंद्र आहे. आनंद आणि उत्साह वाढवणारा दिवस आहे. सात्विक सौख्याचा आनंद घ्याल. धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल.
मिथुन:– संमिश्र दिवस आहे. खर्च वाढतील. विनाकारण गैरसमज होतील. दानधर्म कराल. इतरांसाठी व्यय होईल.
कर्क:- अनुकूल गुरू तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मानसिक समाधान लाभेल. आनंदी राहाल मात्र प्रिय व्यक्तीचा रोष ओढवून घ्याल.
सिंह:- आर्थिक लाभ वाढतील. चांगली आवक होईल. नोकरीत उत्तम यश मिळेल. कौतुक होईल. मौल्यवान वस्तू सांभाळा.
कन्या:– प्रवास योग येतील. त्यातून भरपूर लाभ होतील. व्यावसायिक बैठका यशस्वी होतील. लक्ष्मी प्रसन्न होईल.
तुळ:- चतुर्थ भावात चंद्र आहे. घरासाठी वेळ द्यावा लागेल. हरवलेल्या वस्तू सापडतील. घरातील ज्येष्ठ व्यक्तीचे आशीर्वाद लाभदायक ठरतील.
वृश्चिक:– अनुकूल दिवस आहे. व्यावसायिक यश मिळेल. स्वप्ने साकार होतील. मन आनंदी राहील. प्रवासात काळजी घ्या.
धनु:- संमिश्र दिवस आहे. अपेक्षित यश मिळण्यास वेळ लागेल. आरोग्य सुधारेल. एखादी सुखद घटना घडेल.
मकर:- तुमच्याच राशीत चंद्र आहे. प्रसन्न सकाळ उजाडेल. पण मन अस्वस्थ राहील कामामध्ये लक्ष लागणार नाही.घरगुती वाद होण्याची शक्यता, प्रिय व्यक्तीची काळजी घ्या
कुंभ:- व्यय स्थानी चंद्र आहे. खर्चात वाढ संभवते. सामाजिक कामासाठी देणगी द्याल. आर्थिक लाभ होतील. येणी वसूल होतील. मात्र अपेक्षेपेक्षा कमी असतील.
मीन:- अनुकूल दिवस आहे. नात्यातून लाभ होतील. विरोधक पराभूत होतील. स्वप्न साकार होतील. मात्र प्रिय व्यक्तीची नाराजी अनुभवाल.
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)
