ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
फाल्गुन शुक्ल प्रतिपदा. शिशिर ऋतू.
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र – उत्तराभाद्रपदा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मीन.
“आज उत्तम दिवस आहे.”
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)
मेष:- आवडती वस्तू विकत घेण्यासाठी खर्च कराल. भ्रमंती घडेल. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी घडेल. कमी बोलणे हिताचे आहे.
वृषभ:- उत्तम दिवस आहे.स्वप्ने साकार होतील.भेटवस्तू मिळतील.मित्र मंडळी भेटतील.
मिथुन:- नोकरीत बदल संभवतात. कनिष्ठ व्यक्तीकडून लाभ होतील. कामानिमित्त बाहेर गावी जावे लागेल.
कर्क:- मोठ्या घडामोडी घडतील. दूरचे प्रवास संभवतात. अचानक लाभ होतील.
सिंह:- संमिश्र दिवस आहे. अष्टम स्थानातील बुध अर्थप्राप्ती करून देईन. स्त्रीधन वाढेल.
कन्या:- राशी स्वामीची स्वराशीवर दृष्टी आहे. कामाचा उरक वाढेल. जनशक्ती पाठीशी उभी राहील. नवीन व्यवसाय सुरू कराल.
तुळ:- उत्तम आर्थिक प्राप्ती होईल. व्यवसाय वाढेल. मोठी उलाढाल अपेक्षित आहे. वेळ दवडू नका.
वृश्चिक:- शेअर्स मध्ये लाभ मिळवून देणारा दिवस आहे. अंदाज अचूक ठरतील. अचानक लाभ होतील.
धनु:- बगिच्यात काही बदल घडतील. व्यवसाय वाढेल. पाळीव पशूंचा लाभ मिळेल. घर बदलण्यास चांगला दिवस आहे.
मकर:- लेखकांना उत्तम दिवस आहे. पुस्तक प्रकाशन करण्यास उत्तम कालावधी आहे. इतरांना प्रेरक वाटेल असा पराक्रम कराल.
कुंभ:- विक्री व्यवसायात लाभ होतील. कोर्टात यश मिळेल. वक्तृत्व गाजेल. मेजवानी मिळेल.
मीन:- तुमच्या राशीत चंद्र बुध युती आहे. उत्साह वाढेल. अडलेली कामे मार्गी लागतील. नवीन खरेदी होईल.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
