आजचे राशिभविष्य सोमवार,२० मे २०२४

२० मे रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
वैशाख शुक्ल द्वादशी. ग्रीष्म ऋतू.  
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र – चित्रा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कन्या/ (दुपारी ४.३५ नंतर) तुळ.
“आज दुपारी १२.०० पर्यंत चांगला दिवस आहे.”*सोम प्रदोष*  
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:- सुरुवात चांगली होणार आहे. सकाळच्या सत्रात कामे पूर्ण करा. कुटुंबाला वेळ द्याल.

वृषभ:- अनुकूल दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. अचानक एखादा सुखद अनुभव येऊ शकतो. सन्मान मिळतील.

मिथुन:- कौटुंबिक सौख्य लाभेल. चांगले लाभ होतील. प्रतिष्ठा पणास लागेल. अहंकार सुखावेल

कर्क:- पूर्वार्ध चांगला आहे. आत्मविश्वास वाढेल. आर्थिक लाभ वाढतील. मनासारखा खर्च कराल.

सिंह:-  संमिश्र दिवस आहे. कामाच्या ठिकाणी अप्रिय अनुभव येतील. सकाळी कामे पूर्ण करा.

कन्या:- अनुकूल दिवस आहे. मनाप्रमाणे घटना घडतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. प्रवासात त्रास.

तुळ:- सौख्य देणारा दिवस आहे. मन आनंदी राहील. मात्र संमिश्र अनुभव येतील. उत्तरार्ध चिंता आणि खर्च वाढवणारा.

वृश्चिक:- सकाळ अनुकूल आहे. व्यवसाय वाढ होईल. राजकीय क्षेत्रात जपून वाटचाल करा. अपेक्षाभंग होऊ शकतो.

धनु:- अनुकल स्थानी चंद्र आहे. सकाळी संमिश्र अनुभव येतील. आरोग्य सांभाळा. उत्तरार्ध उमेद वाढवणारा आहे.

मकर:- व्यावसायिक कामात वेळ जाईल. आनंदात दिवस व्यतीत होईल. आयुष्यत काही मोठे बदल घडतील.

कुंभ:– विनाकारण खर्च वाढतील. सकाळी समस्यांचा सामना करावा लागेल. उत्तरार्ध अमृग दाखवणारा आहे.

मीन:- सुरुवात चांगली होणार आहे. पण कनिष्ठ सहकारी असहकार करतील. दुपारी नियोजन बदलावे लागेल.

२० मे रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये
तुमच्यावर चंद्र, शुक्र आणि बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचा मित्र परिवार मोठा असतो. वैचारिक लेखनाची जास्त आवड असते. भिन्न लिंगी व्यक्तींमध्ये तुम्ही लोकप्रिय असतात. तुमच्या जवळ चांगले शब्दभांडार असते. बोलण्यात तुम्ही चतुर असतात. आर्मविश्वासभरपूर असून दुर्बल लोकांना मदत करतात. विवाहानंतर भाग्योदय होतो. तुमचा भाग्योदय पाणथळ जागेजवळ होतो.तुम्ही  भावनिक आणि हळवा असून लवकर अस्वस्थ होतात.

कोडे सोडवण्याचा तुम्हाला छंद असतो. लॉटरी आणि शेअर्सची आवड असते. तुम्ही कष्टाळू असून योग्य निर्णय घेतात. स्वभावाने शांत असले तरी स्वतःची मताशी तडजोड करत नाहीत. अनाठायी चिंताकरणे तुम्ही टाळले पाहिजे.  भाषण, लेखन, रेडिओ, टीव्ही वरील मालीका यांची तुम्हाला आवड असते. दुसऱ्याच्या सूचनेनुसार तुम्ही अधिक चांगले काम करतात. अर्थात तुमचे स्वतंत्र विचार असतात परंतु इतरांचे विचार प्रत्यक्षात आणणे तुम्हाला अधिक आवडते. तुम्ही गर्दीत रमतात. तुम्हाला नवनवीन गोष्टींची आवड असते. प्रवास करणे आवडते. तुम्ही अत्यंत बुद्धिमान, चतुर आणि शास्त्राची आवड असणाऱ्या आहात .

तुमच्या संपर्कात येणारी व्यक्ती उत्साहित होते. तुम्ही आदर सहानुभूती आणि प्रेमाला जास्त महत्त्व देतात. तुमची इतरांवर चटकन छाप पडते. तुमचं मित्र मंडळ मोठ असतं आणि त्यांच्यासाठी तुम्ही मदतीला तयार असतात. योग्य आणि अयोग्य याची निवड तुम्ही सहज करू शकतात. तुमच्यात उत्तम कल्पनाशक्ती आहे. तुम्ही स्वातंत्र्यप्रिय आहात. सतत तुम्ही कार्यमग्न असतात. तुम्ही नम्र आहात मात्र आपले कौतुक व्हावे असे तुम्हाला मनापासून वाटते. तुमच्या वयापेक्षा अधिक वयाच्या लोकांकडे तुम्ही आकर्षित होतात.
व्यवसाय:- बँकिंग, वकील, न्यायाधीश, चार्टर्ड अकाउंटंट, सचिव, लेखन, वक्ते.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, शुक्रवार.
शुभ रंग:- पांढरा, निळा, जांभळा, पिवळा.
शुभ रत्न:- पाचू, मोती, हिरा. (रत्ने वापरण्यापूर्वी कुंडली परीक्षण करून घ्यावे)

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.