आजचे राशिभविष्य सोमवार,३० सप्टेंबर २०२४ 

 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
भाद्रपद कृष्ण त्रयोदशी.शरद ऋतू. 
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
“आज वर्ज्य दिवस आहे.” *सोमप्रदोष, शिवरात्री* त्रयोदशी श्राद्ध.
चंद्र नक्षत्र – पूर्वा (फाल्गुना). 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – सिंह. 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:- चंद्राचा मंगळाशी लाभ योग आहे. प्रापंचिक सुख मिळेल. संततीशी सुसंवाद साधाल. गुंतवणूक करताना काळजी घ्या.

वृषभ:-  सामाजिक कार्यात भाग घ्याल. प्रसंगी कठोर बोलावे लागेल. शब्दास मान द्यावा लागेल. मेजवानी मिळेल.

मिथुन:- तृतीय स्थानी चंद्र आहे.  भावंड मदत करतील. पराक्रम गाजवाल. दबदबा वाढेल. प्रेमात यश मिळेल.

कर्क:- कौटुंबिक सौख्य लाभेल. मन आनंदी राहील. खरेदी होईल. गृह सजावट कराल. मित्र मंडळी येतील.

सिंह:–  अनुकूल योगातील चंद्र तुमच्याच राशीत आहे. आत्मविश्वास भरपूर वाढलेला आहे. कष्ट केल्यास यश मिळेल. वादविवाद टाळा.

कन्या:- आज अनुकूल दिवस नाहीये. तुमच्या राशीत सूर्य – बुध युती आहे. दिरंगाई अनुभवाल. विनाकारण त्रास होईल. खर्च वाढतील. आरोग्य सांभाळा.

तुळ:– लाभ स्थानी चंद्र आहे. प्रणयरम्य दिवस आहे. सुखद अनुभव येतील. उत्साह वाढेल. विवाह इच्छुकांना चांगली बातमी समजेल.

वृश्चिक:- मौल्यवान खरेदी होईल. कामाचा पसारा वाढेल. ऐनवेळी नवीन जबाबदारी येऊन पडेल. जमिनीची कामे मात्र लांबणीवर पडतील.

धनु:- शुक्र अनुकूल आहे. काही विशेष घटना घडतील. नवीन संधी चालून येतील. प्रवास होतील. कोर्टात यश मिळेल.

मकर:-संमिश्र कालावधी आहे. फारशी अनुकूलता नाही. विनाकारण वादात पडू नका. कुटुंबास वेळ द्या.

कुंभ:– सप्तम चंद्र आहे. भेटवस्तू मिळेल. येणी वसूल होतील. गुप्त शत्रूचा त्रास मात्र वाढेल. कोर्ट कामात दिरंगाई जाणवेल.

मीन:- अनुकूल दिवस आहे. व्यवसायात लाभ होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. तुमचे स्पर्धक मात्र शिरजोर होऊ शकतात. राजकीय भाष्य टाळा.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!