आजचे राशिभविष्य शनिवार,१६ डिसेंबर २०२३ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
मार्गशीर्ष शुक्ल चतुर्थी. हेमंत ऋतू, दक्षिणायन. 
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज सकाळी ९.०० पर्यंत चांगला दिवस आहे” *विनायकी चतुर्थी*
नक्षत्र: श्रवण. आज जन्मलेल्या बाळाची राशी- मकर. 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) धनप्राप्ती होणार आहे. नोकरीत काही मोठे बदल संभवतात. हातून अतार्किक कृत्ये घडणार नाहीत याची काळजी घ्या.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) आर्थिक आवक वाढेल. शत्रू पराभूत होतील. कोर्ट कामात यश लाभेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) सूर्याचे धनु राशीतील आगमन तुम्हाला मार्ग दाखवेन. नोकरीत दबदबा वाढेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) धाडस आणि पराक्रम यांचा सुरेख संगम घडेल. यश मिळेल. पत्नी खुश राहील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अर्थकारण मजबूत होईल. सामाजिक कार्यात अग्रेसर राहाल. उच्च शिक्षणात अडथळे येऊ शकतात.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) नात्यातून लाभ होतील. स्नेही भेटतील. शुभ घटना घडतील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) जमीन व्यवहारातून यश मिळेल. कठोर भूमिका घ्याल. जोडीदाराशी मतभेद संभवतात.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) व्यवसाय वृद्धी होईल. स्व राशीतील मंगळ तुम्हाला आत्मविश्वास प्रदान करेन.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) सौख्य लाभेल. कामे मार्गी लागतील मात्र गुंतवणुकीची काळजी घ्या. कठोर बोलणे टाळा.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) उत्तम दिवस आहे. उत्साह वाढेल. व्यवसायात जम बसेल. गृहकलह टाळा.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) संमिश्र दिवस आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. मोठे निर्णय नकोत. हाताची काळजी घ्या.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल दिवस आहे. मन प्रसन्न राहील. कायदेशीर प्रकरणात योग्य सल्ला मिळेल.

(कुंडलीवरून करियर,लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!