आजचे राशिभविष्य शनिवार,११ जानेवारी २०२५

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
पौष शुक्ल द्वादशी/ त्रयोदशी. शिशिर ऋतू. क्रोधी नाम संवत्सर.   
राहू काळ – सकाळी ९.३० ते सकाळी १०.३०
चंद्र नक्षत्र – रोहिणी/ (दुपारी १२.२९ नंतर) मृग.  
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृषभ.
“आज क्षय तिथी आहे. *शनिप्रदोष*
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521) 

मेष:-  चंद्राचा रवी, शनी, नेपचूनशी अशुभयोग् आहे. सांभाळून पावले उचला. मोठी जबाबदारी आज नको. शब्द जपून वापरा.

वृषभ:- अनुकूल दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. सामाजिक कार्य कराल. आत्मविश्वास वाढेल. मेजवानी मिळेल.

मिथुन:- संमिश्र ग्रहमान आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. आध्यत्मिक प्रगतीसाठी उत्तम कालावधी आहे. दानधर्म कराल.

कर्क:- लाभ स्थानी चंद्र आहे. नवीन खरेदी होईल. अचानक लाभ होतील. मन आनंदी राहील. स्वप्ने साकार होतील. मात्र मोठे करार आज नकोत.

सिंह:- आर्थिक लाभ होतील. व्यवसाय वाढेल. ग्रहमान अनुकूल आहे. नोकरीत संमिश्र अनुभव येतील.

कन्या:– मन पवित्र विचारांनी भारून जाईल. पूर्वजांची पुण्याई अनुभवास येईल. प्रवास घडतील. आरोग्य सांभाळावे लागेल.

तुळ:- अष्टम स्थानी चंद्र आहे. गूढ गोष्टींचे आकर्षण वाटेल. संपत्ती वाढेल. मात्र नैतिक मार्ग सोडू नये.

वृश्चिक:– उत्तम व्यावसायिक यश लाभेल. मित्रांकडून चांगले सहकार्य लाभेल. पत्नीची मोलाची साथ मिळेल. प्रिय व्यक्ती भेटतील.

धनु:-  संमिश्र ग्रहमान आहे. कामात सहकार्य मिळेल. मन प्रसन्न राहील. आर्थिक लाभ होतील. भरभराट होईल.

मकर:- प्रगती साधणारा दिवस आहे. व्यवसाय वृद्धी होईल. उत्साह वाढेल. संततीकडून चांगली बातमी समजेल.

कुंभ:- तुमच्या राशीतील शनी ची चंद्राचा केंद्र योग आहे. सांभाळून पावले टाका. घरगुती कामे आज पूर्ण होतील. व्यवसायाचे नियोजन चुकू शकेल.

मीन:- उत्तम आर्थिक लाभ होतील. हाती घेतलेले काम पूर्ण होईल. उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. छोटे प्रवास घडतील.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!