आजचे राशिभविष्य शनिवार,१३ जानेवारी २०२४

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
पौष शुक्ल द्वितीया. हेमंत ऋतू,
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज उत्तम दिवस आहे” *श्री सिद्धेश्वर यात्रा*
नक्षत्र: श्रवण.
आज जन्मलेल्या बाळाची राशी-मकर.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) मेहनत वाढवावी लागेल.अचानक एखादी समस्या निर्माण होऊ शकते.नोकरीत डोके शांत ठेवून काम करावे.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) प्रवासात त्रास संभवतो. घरातील जेष्ठ व्यक्तीची चिंता वाटेल. उधारी वाढेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) प्रतिकूल दिवस आहे. मोठे करार आज नकोत. नेहमीची कामे चालू ठेवा.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) प्रतिस्पर्धी डोके वर काढतील. विनाकारण त्रास संभवतो. गृहकलह टाळा.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) सत्य बाजू असूनही आरोप होऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणी गैरसमज टाळा. आरोग्य सांभाळा.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) फारसे मोठे कार्य घडणार नाही. एखादी अप्रिय घटना घडू शकते. वाहन जपून चालवा.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संवाद साधणं महत्वाचे आहे. गैरसमज दूर होतील. कामाचे सेतू उभे राहतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) लाभदायक दिवस आहे. व्यवसाय वाढेल. जुने दुखणे डोके वर काढू शकते.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कलाकारांना उत्तम दिवस आहे. नवीन संधी मिळतील. शब्द देताना जपून द्या.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) गूढ सुटण्यास हे ग्रहमान मदत करेल. आपले कोण आणि परके कोण हे ओळखाल. राजकीय वाटचाल सुकर होईल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) व्यय स्थानी चंद्र आहे. आत्मविश्वास कमी होईल. नियोजन बिघडेल. मोठे करार आज नकोत.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) कामांचा वेग वाढेल. जुनी गुंतवणूक आता मदतीस येईल. शब्द जपून वापरा. घशाचे आजार संभवतात.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.