ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
माघ कृष्ण चतुर्दशी. शिशिर ऋतू,
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज वर्ज्य दिवस आहे”
नक्षत्र: धनिष्ठा/शततारका.
आज जन्मलेल्या बाळाची राशी- कुंभ.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) उत्तम ग्रहमान आहे. अनुकूल चंद्र शनी युती अध्यात्मिक पातळीवर उच्च लाभ देतील. गुरू लाभ योग सर्व गोष्टींसाठी अनुकूल आहे.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) नोकरीत सुखद अनुभव येतील. मनासारखी कामे आणि कमाई होईल. दानधर्म कराल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) छोटे प्रवास घडतील. आनंदी राहाल. अनुकूल गुरू सर्व इच्छा पूर्ण करतील. अचानक लाभ होतील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र दिवस आहे. व्यवसायात वाढ होईल. नोकरीत बढती/ बदलीचे योग येतील. भिन्न लिंगीय व्यक्तीकडून लाभ होतील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) सप्तम स्थानी शनी चंद्र युती आहे. नवम स्थानी गुरू हर्षल आहेत. प्रवास घडतील. जोडीदाराकडून अपेक्षित प्रतिसाद मिळेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक लाभात वाढ होईल. दीर्घकालीन फायदा होईल. एकातून एक व्यापार वाढत जाईल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) मंत्र, तंत्र, विद्या साध्य होईल. गूढ अनुभव येतील. उपासना दैवत प्रसन्न होईल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) सुपीक जमिनीतून उत्तम लाभ मिळतील. विहिरीला पाणी लाभेल. अडचणी दूर होतील.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) जीवनाला वेगळे वळण लागेल. मन स्थिर होईल. छोटे प्रवास घडतील. कठोर बोलणे टाळावे.
मकर:– (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) जुने येणे वसूल होतील. खरेदी विक्रीतून यश मिळेल. अन्नदान कराल. क्रोध टाळावा.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) तुमच्याच राशीत चंद्र आणि शनी युती आहे. सखोल आध्यात्मिक लाभ होतील. संशोधन कराल. खर्च वाढतील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. गूढ चिंतन कराल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. वक्तृत्व कामी येईल.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)