आजचे राशिभविष्य शनिवार,१८ मे २०२४  

१८ मे रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
वैशाख शुक्ल दशमी. ग्रीष्म ऋतू,
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज चांगला दिवस आहे” 
नक्षत्र: उत्तरा (फाल्गुन) 
आज जन्मलेल्या बाळाची राशी- कन्या.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) द्वितीय स्थानातील रवी गुरू युती तुम्हाला एका निश्चित ध्येयाप्रत नेईल. आर्थिक बाजू भक्कम होईल. आरोग्य सांभाळा.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) अनुकूल दिवस आहे. कुटुंबासाठी खरेदी होईल. संतती बाबत खुश खबर मिळेल. प्रिय व्यक्ती खुश होईल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल दिवस आहे. अर्थकारण सुधारेल. नोकरीत सर्वांना खुश कराल. प्रवासात आनंद मिळेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) दिवस अनुकूल आहे. मनासारखी कामे पार पडतील. प्रवास घडतील. व्यावसायिक  लाभ होतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) लाभ वाढतील. सरकारी नोकरीत यश मिळेल. नवीन संधी चालून येतील. खुशखबर मिळेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अत्यंत अनुकूल दिवस आहे. कामाचा पसारा वाढेल. आर्थिक लाभ होतील. भाग्योदय होईल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक दृष्टीने संमिश्र दिवस आहे. सौख्य लाभेल. दानधर्म केल्यास उत्तम लाभ होतील. अधिकाराचा फायदा होईल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  गुंतणुकीतून लाभ मिळतील. सामाजिक कार्यात यश मिळेल. पत्नीची साथ लाभेल. स्पर्धेत विजयी व्हाल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) नोकरी/ व्यवसायात अनुकूलता वाढेल. आर्थिक लाभ होतील. सौख्य लाभेल. आरोग्य सुधारेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल आणि उत्साही दिवस आहे. स्वप्ने पूर्ण होतील. शेतीतून लाभ होतील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) संमिश्र दिवस आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. आर्थिक लाभ होतील. लेखकांना यश मिळेल. खर्च वाढतील.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) प्रवासातून लाभ होतील. मनासारखी कमाई आणि कामे होईल. आर्थिक नियोजन करा.

१८ मे रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये
तुमच्यावर मंगळ, बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही सभ्य आणि मोठा मनाचे आहात. मित्रांशी तुम्ही प्रामाणिक असतात. कोणत्याही जबाबदारी घेतल्यासतुम्हाला त्यात यश मिळते. प्रकृती सुदृढ असते. मात्र विकारांवर ताबा ठेवला पाहिजे. वक्तृत्व चांगले असते. स्वभाव हरहुन्नरी आणि स्वतंत्र असतो. तुम्ही आक्रमक स्वभावाचे, धाडसी, कामात तत्पर आणि प्रतिकार करण्यास सक्षम आहात. थोडक्यात म्हणजे तुम्ही लढाउ वृत्तीच्या आहात.

कधी कधी तुम्ही स्वतः होऊनच एखादे भांडण उकरून काढतात. तुम्ही महत्वाकांक्षी आहात आणि एखाद्या विषयाचा पूर्ण अभ्यास करणे तुम्हाला आवडते. शक्यतो तुम्ही इतरांचा सल्ला मानत नाहीत. मनात घेतलेले काम तुम्ही पूर्ण करतातच. कधीकधी तुमच्यात उतावळेपणा असू शकतो. तुमच्याकडे उत्तम वक्तृत्व आहे. शिकवण्यात तुम्हाला खरा आनंद मिळतो. मोठेपणा, प्रतिष्ठान, मान सन्मान याला तुम्ही प्राधान्य देतात. वारसा हक्काने तुम्हाला संपत्ती मिळते. स्मरणशक्ती चांगली असते.

सरकारी पातळीवर तुम्हाला मानसन्मान मिळतात. स्वतःची चूक मान्य करणे तुम्हाला फारसे पसंत नसते. शक्यतो तुम्ही इतरांवर टीका करणे टाळावे आणि नम्र राहावे यात तुमचा फायदा आहे. तुम्ही शक्तिवान असतात. तुम्हाला मैदानी खेळांची आवड आहे. तुम्ही काहीसे शीघ्रकोपी असले तरी अनेकदा स्वतःच्या मनावर ताबा ठेवू शकतात. तुमच्या विचारांमध्ये ठामपणा आहे. तुम्हाला प्राणी आणि निसर्ग यांची आवड आहे. तुम्ही मोठ्या अधिकाराच्या जागा सांभाळू शकतात.
व्यवसाय:- बेकरी, हॉटेल, दागिने विक्री, आर्किटेक्ट, गृहसजावट, मिल्ट्री, पोलीस, इंजिनीयर, लोखंड. बांधकाम क्षेत्र.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार.
शुभ रंग:- तांबडा, पांढरा, पिवळा.
शुभ रत्न:- पुष्कराज, मोती, माणिक.(रत्ने वापरण्यापूर्वी कुंडलीचा अभ्यास करावा)

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.