आजचे राशिभविष्य शनिवार,४ मे २०२४ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
चैत्र कृष्ण एकादशी. ग्रीष्म ऋतू, 
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज सकाळी ११.०० पर्यंत चांगला दिवस आहे” *वरूथीनि एकादशी, श्री.वल्लभाचार्य जयंती* 
नक्षत्र: पूर्वाभाद्रपदा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी- कुंभ /(दुपारी ४.३८ नंतर) मीन. 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अत्यंत अनुकूल दिवस आहे.अनपेक्षित शुभ घटना घडतील.मनाची एकाग्रता ढळू देऊ नका.संध्याकाळ खर्चाची.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) अनुकूल दिवस आहे.कुटुंबासाठी खरेदी होईल.प्रिय व्यक्ती खुश होईल.नोकरीत प्रसन्न दिवस जाईल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अर्थकारण सुधारेल.नोकरीत सर्वांना खुश कराल. प्रवासात आनंद मिळेल.धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उत्तरार्ध अनुकूल आहे. मनासारखी कामे पार पडतील. प्रवास घडतील. व्यावसायिक आणि धार्मिक लाभ होतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) पूर्वार्ध चांगला आहे. वाहतूक व्यवसायातून यश मिळेल. लाभ वाढतील.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अत्यंत अनुकूल दिवस आहे. कामाचा पसारा वाढेल. आर्थिक लाभ होतील. स्त्रीधन वाढेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक दृष्टीने अनुकूल दिवस आहे. सौख्य लाभेल. अधिकाराचा फायदा होईल. तीर्थयात्रा घडेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) जुन्या वस्तू सापडतील. गुंतवणुकीतून लाभ मिळतील. सामाजिक कार्यात यश मिळेल.पत्नीची साथ लाभेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अनुकूलता वाढेल. आर्थिक लाभ होतील. सौख्य लाभेल. शेअर्स मध्ये लाभ मिळतील. पराक्रम गाजवाल.

मकर:– (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल आणि उत्साही दिवस आहे. स्वप्ने पूर्ण होतील. शत्रू पराभूत होतील. संतती बाबत चांगली बातमी समजेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) दिवसाचा पूर्वार्ध चांगला आहे. कामे पूर्ण करवून घ्या. अनपेक्षित लाभ होतील. कलाकारांना यश लाभेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) सकाळी फारशी अनुकूलता नाही. सरकारी कामातून त्रास होऊ शकतो. बोलण्यातून वरिष्ठ नाराज होऊ शकतात.

(कुंडलीवरून करियर,लग्न,व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.