आजचे राशिभविष्य रविवार,२५ ऑगस्ट २०२४

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
श्रावण कृष्ण सप्तमी. क्रोधी नाम संवत्सर.    
राहुकाळ – दुपारी ४:३० ते संध्याकाळी ६.००
“आज वर्ज्य दिवस आहे”*भानुसप्तमी*
नक्षत्र: भरणी/कृतिका. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी- मेष/(रात्री ११.३० नंतर) वृषभ.विष्टी करण शांती करावी. 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्र तुमच्याच राशीत शुक्राच्या नक्षत्रात आहे. प्रणयरम्य दिवस आहे. वातावरणाचा आनंद घ्याल. सहल घडेल. भौतिक सुखे प्राप्त होतील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो)  चैनीसाठी खर्च कराल. कलाकारांना मेहनताना मिळण्यासाठी उशीर होईल. वाहन सुख मिळेल. एखादा वेगळाच निर्णय घ्याल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल चंद्र आणि प्रसन्न ग्रहमान आहे. नवीन खरेदी होईल. भेटवस्तू मिळतील. आवडते पदार्थ चाखाल. रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहू नये.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अनुकूल ग्रहमान आहे. भिन्न लिंगी व्यक्तीकडून लाभ होतील. प्रेमात यश मिळेल. अचानक लाभ होतील. मेजवानी मिळेल.

सिंह:- (मा, मी, मु मे, मो, टा, टी, टू, टे) नेतृत्व गाजेल. कलाकारांना उत्तम यश मिळेल. विरोधक पराभूत होतील. भागीदारीतून लाभ होतील.

कन्या:- (टो,पा,पी,पू,षा, णा,ठा,पे,पो) अष्टमस्थानी चंद्र आहे. सावधपणे वाटचाल करा. अनुकूल बुध तुम्हाला योग्य सल्ला मिळवून देईन. मौज कराल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल ग्रहमान आहे. आवडत्या वस्तूसाठी खर्च कराल. गायन -वादन यापासून आनंद मिळेल. शेती उत्पादन वाढेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) प्रगतीची घोडदौड चालूच राहील. पाणथळ जागेजवळ भाग्योदय होईल. दुर्बल व्यक्ती सोबत न्याय कराल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अचानक लाभाचे योग आहेत. लॉटरी मधून यश मिळू शकते. छोटे प्रवास घडतील. संवाद साधणे होईल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) मनःस्वास्थ बिघडेल .प्रकृतीची काळजी घ्या, सामोपचाराने चर्चा करा,दुपार नंतर चांगला योग,

कुंभ:– (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक लाभासाठी चांगला दिवस आहे. तुम्ही बुद्धिमान आहात पण व्यवहारी नाही. आज पाठपुरावा करा. येणी येतील. तुमच्या अधिकाराचा गैरवापर नको.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) तुमचा अंदाज अचूक येईल. नियोजनाप्रमाणे कामे होतील. धार्मिक कामासाठी वेळ द्यावा लागेल. सौख्य लाभेल.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.