आजचे राशिभविष्य रविवार,१४ जानेवारी २०२४ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
पौष शुक्ल तृतीया/चतुर्थी. हेमंत ऋतू. शोभन नाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज क्षय तिथी आहे” *विनायक चतुर्थी, भोगी, धनुर्मास समाप्ती* 
चंद्र नक्षत्र – धनिष्ठा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी –  कुंभ. 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521) 

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अत्यंत अनुकूल दिवस आहे. लक्ष्मी प्रसन्न होईल. स्वप्ने साकार होतील. स्त्री धन वाढेल. धर्मकार्य घडेल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) व्यावसायिकांना अतिशय शुभ दिवस आहे. मन आनंदी राहील. आर्थिक तरतूद होईल. वरिष्ठ खुश होतील.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) ज्याची वाट बघत होतात ते घडेल. जुने मित्र भेटतील. तीर्थयात्रा घडेल. प्रिय व्यक्तीकडून चांगली बातमी समजेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र दिवस आहे. आशादायक चित्र निर्माण होईल. प्रेमात यश मिळेल. जुन्या वस्तू सापडतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे)  पराक्रमाला कल्पकतेची जोड मिळेल. पंचमातील मंगळ, बुध आणि नवमात गुरू उत्तम लाभ देतील. सौख्य लाभेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. एखादी चांगली बातमी समजेल. आर्थिक आवक वाढेल. स्थावर संपत्तीची कामे मार्गी लागतील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) विदवत्ता आणि कलात्मकता याचा अनोखा संगम आज तुम्ही अनुभवाल. नातेसंबंध कामास येतील. कीर्ती दिगंत पसरेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) जुनी अडकलेली कामे मार्गी लागतील. सर्वार्थाने अनुकूल कालावधी आहे. वेळ दवडू नका.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) नव्या – जुन्याचा अनोखा संगम बघण्यास मिळेल. संतती सुख लाभेल. शुभ समाचार समजतील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र कालावधी आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. खरेदी कराल. वाहन सुख प्राप्त होईल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा)  आज तुमच्याच राशीतील चंद्र अनुकूल मंगळ आणि बुधाशी लाभ योग करत आहे. अत्यंत अनुकूल कालावधी आहे.  स्वप्ने पूर्ण होतील.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. सुटी असली तरी नोकरीत अधिक काम करावे लागू शकते. मात्र त्याचा पुढे फायदा होईल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521) 

 

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!