आजचे राशिभविष्य रविवार, ९ जून २०२४

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
जेष्ठ शुक्ल तृतीया. क्रोधीनाम संवत्सर.   
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज उत्तम दिवस आहे” 
चंद्र नक्षत्र – पुनर्वसु/पुष्य. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मिथुन/ (दुपारी २.०७ नंतर) कर्क.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)  सकाळच्या सत्रात महत्वाची कामे पूर्ण करा. अर्थकारण मजबूत होईल. कौटुंबिक समस्या मिटतील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अनुकूल दिवस आहे. पूर्वार्धात कामे पूर्ण करा. संध्याकाळ आनंदात पण आरामात व्यतीत होईल.

मिथुन:– (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) मेहनत वाढवा. नवीन काही शिकण्यास मिळेल. त्याचा आनंद घ्या. अचानक खर्चात वाढ होईल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) दिवसाचा पूर्वार्ध अनुकूल नाही. शांतपणे नेहीमीची कामे चालू ठेवा. उत्तरार्ध अनुकूल आहे. लाभ होतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) सुरुवात चांगली होणार आहे. संमिश्र दिवस आहे. उत्तरार्धात फारशी अनुकूलता नाही.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल ग्रहमान आहे. मनासारखी कामे होतील. वाहन जपून चालवा. यंत्र हाताळताना काळजी घ्या.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) तीर्थाटन घडेल. आर्थिक लाभ होतील. नवीन संधी मिळतील. एखादी चांगली बातमी येऊ शकते.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  दिवसाची सुरुवात संथ होणार आहे. भागीदारी व्यवसायात तोडगा निघेल. दिवसाचा उत्तरार्ध चांगला आहे.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)  महत्वाची कामे आज सकाळी पूर्ण करा. पत्नीची काळजी घ्या. प्रिय व्यक्तीची भेट होईल. उत्तराध मन अस्वस्थ करणारा असू शकतो.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) लाभदायक दिवस आहे. पराक्रम गाजवाल. नातेवाईक भेटतील. व्यावसायिक लाभ होतील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) धनप्राप्ती होईल मात्र आरोग्याची काळजी घ्या. संततीचे म्हणणे ऐकावे लागेल. संध्याकाळ नात्यात कटुता आणणारी असू शकते.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) चौथा आणि पाचवा चंद्र आहे. लेखकांना यश मिळेल. कठोर बोलणे आणि वागणे टाळावे. संध्याकाळी संयम ठेवणे आवश्यक आहे.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार,या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या.कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा.-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.