आजचे राशिभविष्य रविवार,१० मार्च २०२४ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
माघ अमावस्या.शिशिर ऋतू.शोभन नाम संवत्सर. 
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज वर्ज्य दिवस आहे” *दर्श अमावस्या*  
चंद्र नक्षत्र – पूर्वाभाद्रपदा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कुंभ/मीन.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अचानक लाभाचे योग आहेत. अनुकूल ग्रहमान आहे. नेहमीपेक्षा वेगळा विचार कराल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) मनासारखी कामे मार्गी लागतील. प्रिय व्यक्तीसाठी खर्च कराल.नोकरीत अचानक एखादे काम सामोरे येऊ शकते.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अत्यन्त उत्तम ग्रहमान आहे. लाभदायक दिवस आहे. संधीचे सोने करा. व्यस्त रहा.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कामाचा ताण वाढेल. मात्र त्यातून लाभ होतील. रसायने आणि अग्नी संबंधित व्यापारात यश लाभेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) जेष्ठ व्यक्तीकडून लाभ होतील. परदेशी व्यापारातून यश मिळेल. जोडीदाराशी विनाकारण वाद वाढवू नका.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. आरोग्याची काळजी घ्यावी. चालढकल नको. वाहन जपून चालवावे.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) पंचमस्थानी रवी चंद्र युती आहे. भलते धाडस नको. काव्य, शास्त्र यांचा आनंद घ्याल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) नोकरीतील एखादे छोटेसे प्रकरण मोठे होऊ शकते. काळजी घ्या. मन शांत ठेवा. आरोग्य सांभाळा.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अति साहस नको प्रवास टाळणे. प्रवास टाळणे हिताचे आहे. संतती कडून चांगले अनुभव येतील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) धनधान्य वाढेल. मनासारखी कामे होतील. बाग बगीचा मध्ये फिरताना काळजी घ्या. सरकारी कामात दिरंगाई नको.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा)  मेजवानी मिळण्याचा दिवस आहे. अधिकार वाढतील मात्र त्याचा गैरवापर नको. अहंकार टाळल्यास आज उत्तम कामे होतील.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) लवकरच परिस्थिती बदलेल. अडचणी दूर होतील. संयम ठेवावा लागेल. सरकारी कामात लक्ष घालावे लागेल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521) 

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!