आजचे राशिभविष्य,रविवार,१७ मार्च २०२४ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
फाल्गुन शुक्ल नवमी.शिशिर ऋतू.शोभन नाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज सकाळी १०.०० नंतर चांगला दिवस आहे” *दुर्गाष्टमी*  
चंद्र नक्षत्र – मृग/आर्द्रा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मिथुन.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) उत्तम दिवस आहे. शुक्रशी चंद्राचा शुभ योग आहे. चैनीवर खर्च कराल. उत्साह वाढेल. सरकारी नियमांचे भान ठेवावे लागेल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. अनुकूल रवी, राहू प्रतिष्ठा वाढवतील. मान सन्मान मिळेल. नोकरीत भिन्न लिंगी व्यक्तीकडून लाभ होतील.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) सुटी असली तरी कामाचा ताण वाढेल. व्यावसायिक कामे पूर्ण करावी लागतील. अनुकूल शुक्र मन आनंदी ठेवेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र दिवस आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. आर्थिक लाभ होतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूल दिवस आहे. अत्यंत आनंदी राहाल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. आरोग्याची काळजी घ्या.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) भागीदारी व्यवसायात विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात. सरकारी कायदे कटाक्षाने पाळा.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकल चंद्र शुक्र ग्रहमनाचा आनंद घ्या. प्रेमात यश मिळेल. आर्थिक लाभ होतील. आनंदी राहाल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. वाहन सौख्य लाभेल. गृह सजावट कराल. संततीशी मतभेद संभवतात.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) छंद जोपासले जातील. कौटुंबिक संमेलन होईल. कलाविष्कार कराल. घरापासून दूर जाणे होईल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अर्थप्राप्ती होईल. खरेदीतून चांगल्या सवलती प्राप्त होतील. मौल्यवान वस्तू घरात येतील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा)  प्रणयरम्य दिवस आहे. वैवाहिक सौख्य अनुभवाल. गुंतवणूक कराल. घशाची काळजी घ्या.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) तुमच्या राशीतील रवीशी चंद्राचा केंद्र योग आहे. काहीशी ताठर भूमिका घ्याल. घरात किरकोळ कुरबुरी होतील. खर्च वाढेल.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव”या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521) 

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.