ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक.
वैशाख शूला एकादशी.ग्रीष्म ऋतू.क्रोधीनाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००”
आज दुपारी २.०० नंतर चांगला दिवस आहे” *मोहिनी एकादशी*
चंद्र नक्षत्र – हस्त.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कन्या.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्र मंगळ प्रतियुती आहे. विनाकारण अहंकार केल्यास मोठा तोटा सहन करावा लागेल. स्वभावाला मुरड घाला.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. चंद्र पंचम स्थानी आहे. वादविवाद टाळा. चुकीचा मार्ग नको.
मिथुन:– (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) राहत्या ठिकाणी कटकटी संभवतात. नातेवाईक नाराज होऊ शकतात.नोकरी/व्यवसायात स्पर्धा जाणवेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अर्थकारण सावरेल. प्रवासात त्रास संभवतो. चोरीचे भय आहे. आर्थिक गणिते चुकतील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. नाती हाताळताना काळजी घ्या. गैरसमज होण्याचे भय आहे. वाहन जपून चालवा.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) शत्रू त्रास जाणवेल. मोठी स्पर्धा होईल. कोर्ट कामत अपयश येईल. व्यावसायिक बाबतीत जपून निर्णय घ्या.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) चंद्र अनुकूल आहे मात्र षष्ठ स्थानी मंगळ आहे. भलते धाडस नको. आर्थिक लाभ होतील मात्र खर्च वाढेल. वाहन जपून चालवा.
वृश्चिक:– (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) नोकरीच्या ठिकाणी दबदबा वाढेल. सामाजिक कार्य कराल. परदेशगमन घडेल. लॉटरी/जुगार टाळा.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) नोकरी आणि घरगुती प्रसंगात संयम ठेवा. भिन्न लिंगी व्यक्तीकडून त्रास होऊ शकतो. वाद विवाद टाळून माघार घ्या.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) कामाच्या ठिकाणी काम करणे हिताचे आहे. विनाकारण राजकारण नको. वाद टाळा. हाताची काळजी घ्या.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) प्रतिकूल दिवस आहे. कमी बोलणे हीताचे आहे. उधारी टाळा. अपघाताचे भय आहे.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) तुमच्या सप्तम स्थानातील राशीत चंद्र प्रतियुती मंगळ आहे. अहंकार वाढेल. कठोर बोलणे होईल. वाद टाळा.
१९ मे रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये
तुमच्यावर शुक्र, बुध आणि रवी या तीन ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचा जन्म चांगल्या आणि श्रीमंत घराण्यात होतो. तुम्ही संशोधक वृत्तीचे आहात. स्वभाव तापट असून भांडणाचे प्रसंग वरचेवर येत राहतात. प्रेमात उतावीळ होणे ठीक नाही. तुम्हाला अधिकार आणि प्रतिष्ठा मिळते. तुम्ही इतरांची परीक्षा चांगल्या प्रकारे करू शकतात. इतरांची माहिती तुम्ही गुप्त ठेवतात. त्यामुळे तुम्ही विश्वासू असतात. स्वभाव स्वतंत्र असतो. इतरांची लुडबुड चालत नाही. तुमचा सहवास उत्साहवर्धक असतो. तुम्ही व्यावहारिक सल्ला उत्तम प्रकारे देतात. तुम्हाला घराचा फारसा ओढा नसतो. तुम्ही अभ्यासू आहेत.
जबाबदारीच्या जागा तुम्ही पैलू शकतात. तुमचा स्वभाव धडपडा असतो. तुम्हाला मोठेपणा आणि प्रतिष्ठा मनापासून आवडते. व्यवसाय किंवा नोकरीत तुम्हाला चांगले यश मिळते. तुम्ही तत्परतेने इतरांना मदत करतात. तुमची आवड नेहमी उच्च दर्जाची असते. तुम्ही स्वतंत्र विचाराचे आहात. तुमचा सतत बदल करण्याकडे ओढा असतो. तुम्ही एकाच गोष्टीत फार काळ रमत नाहीत. आपल्या आयुष्यात काहीतरी सनसनाटी असावा असं तुम्हाला नेहमी वाटत असतं. तुमच्या कामात सातत्य असतं आणि तुम्ही कार्यक्षम आहात. तसे तुम्ही प्रेमळ आहात. मित्रां बद्दल तुम्हाला सहानुभूती आणि आदर असतो. तुम्ही कलासक्त असतात. सौंदर्याचे भोक्ते असतात.
अनेकदा सुगंधी द्रव्ये वापरणे तुम्हाला आवडते. तुम्हाला प्रवासाची देखील आवड आहे. तुम्ही इतरांना चांगला सल्ला देऊ शकतात. उच्चप्रतीचे कपडे, दागिने, वाहन, घर तुम्ही वापरत असतात. आर्थिक बाबतीत तुम्ही नशीबवान आहात. तुम्ही बुद्धिमान आहात आणि तुम्हाला गणित, शास्त्र आणि व्यापार यांची आवड आहे. तुम्ही झटपट काम करतात. तुमचा कामाचा वेग जास्त असतो. एखादे काम हाती घेतल्यावर तुम्ही त्याचे पूर्वनियोजन उत्तम प्रकारे करतात. तुम्हाला गूढ गोष्टींची आवड असते. तुम्ही प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे आहात. आळशीपणा तुम्हाला आवडत नाही. तुमची इच्छाशक्ती दांडगी असते. संशोधन करण्यात तुम्हाला रस असतो. तुमच्या बोलण्यात मोहक पणा आहे. लोकांना तुमचे बोलणे आवडते. तुम्ही तर्कशुद्ध विचार करतात आणि एखाद्या गोष्टीचा उत्तम विश्लेषण करू शकतात. हट्टीपणा, उतावीळपणा आणि स्वार्थीपणा टाळला पाहिजे.
व्यवसाय:- तुम्ही एकाच व्यवसायात रमत नाहीत. व्यवसायात बदल करत असतात. पुस्तक विक्रेता, आयात-निर्यात, वृत्तपत्र व्यवसाय, इंटरनेट, इंटरियर डेकोरेटर, डिपार्टमेंटल स्टोअर, केमिस्ट, इंजिनियर.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार, शुक्रवार.
शुभ रंग:- सोनेरी,पिवळा, हिरवा.
शुभ रत्ने:- माणिक, पाचू, मोती. (रत्ने वापरण्यापूर्वी कुंडली परीक्षण करून घ्यावे)
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)
