आजचे राशिभविष्य रविवार,१३ ऑक्टोबर २०२४

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
अश्विन शुक्ल एकादशी. शरद ऋतू.  क्रोधीनाम संवत्सर.   
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज रात्री ८.०० पर्यंत चांगला दिवस आहे”*पाशंकूशा (स्मार्त) एकादशी* 
चंद्रनक्षत्र – धनिष्ठा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मकर/(दुपारी ३.४४ नंतर) कुंभ. शूल योग आहे.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अत्यंत अनुकूल दिवस आहे. सौख्य लाभेल. मनासारखी कामे होतील. सन्मान मिळतील. अनपेक्षित लाभ होतील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) पराक्रम गाजवाल. सन्मान प्राप्त होतील. चंद्राचा रवी, बुध, गुरू शी शुभ त्रिकोण योग आहे. वेगळा विचार कराल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) सुरुवातीला अष्टम स्थानी चंद्र आहे. तरीही काही सुखद अनुभव येतील. आवडत्या वस्तूची खरेदी होईल. शेतीतून लाभ होतील. संध्याकाळ आनंदाची.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो)  अनुकूल दिवस आहे. संधीचे सोने करा. वेळ दवडू नका. अचानक लाभ होतील. संध्याकाळ खर्चात टाकणारी आहे.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूल दिवस आहे. नोकरीत उत्तम प्रगती होईल. वरिष्ठ खुश होतील. मोठ्या जबाबदाऱ्या पार पडाल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) सिद्धी प्राप्त होतील. लक्ष्मीची कृपा राहील. भरघोस यश मिळेल. व्यापार वाढेल. घरगुती कामे पूर्ण होतील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल दिवस आहे. धाडस कराल. आर्थिक लाभ होतील. प्रेमात मात्र फसवणूक सांभावते.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  दबदबा वाढेल. सामाजिक कार्य कराल.  प्रिय व्यक्तीची भेट होईल. आर्थिक भरभराट होईल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)  उत्तम आर्थिक यश मिळेल. मेजवानी मिळेल. वक्तृत्व चमकेल. शब्दास मान मिळेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) कला प्रांतात उत्तम यश लाभेल. राजकीय क्षेत्रात वाटचाल कराल. गुंतवणुकीतून लाभ होतील. आनंद देणाऱ्या घटना घडतील.

कुंभ:– (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) सुरुवातीला व्यय स्थानी चंद्र आहे.  प्रवास घडतील. खर्च वाढेल. मनस्ताप संभवतो. संध्याकाळी सामाजिक कार्यातून नावलौकिक मिळेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची)  कामाची प्रगती होईल. शत्रू पराभूत होतील. व्यवसाय वाढेल. कलाकारांना यश मिळेल. अचानक एखादा खर्च वाढेल.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.