आजचे राशिभविष्य रविवार,६ ऑक्टोबर २०२४

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
अश्विन शुक्ल चतुर्थी. क्रोधीनाम संवत्सर.   
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज विशाखा वर्ज्य दिवस आहे” *विनायकी चतुर्थी* 
चंद्र नक्षत्र – विशाखा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी –  तुळ/ (संध्याकाळी ५.३४ नंतर) वृश्चिक. 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521) 

मेष:(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)  अष्टम चंद्राचा हर्षल शी प्रति योग आहे. धाडसी निर्णय घ्याल. मोठी जोखीम टाळा. महत्वाची कामे आज शक्यतो नकोत. व्यसने टाळा.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आर्थिक लाभ होतील. कुटुंब सुख लाभेल. मन आनंदी राहील. कामात काही बदल घडतील.

मिथुन:(का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्तम दिवस आहे. सुट्टीचा आनंद घ्याल. व्यापार उदीम वाढेल. भरभराट होईल.

कर्क:(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) बौद्धिक क्षेत्र गाजवाल. वेगळ्या वाटेने जाल. गृह सजावट कराल. शेतीतून लाभ होतील.

सिंह:-(मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे)  दिवसाच्या सुरुवातीला आर्थिक लाभ होतील. व्यवसायात वाढ होईल. बुद्धिमान वर्तुळात वावर वाढेल.

कन्या:-(टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो)  अनुकूल ग्रहमान आहे. मनासारखी कामे होतील. मौल्यवान खरेदी कराल. धार्मिक पर्यटन घडेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)  अनुकूल दिवस आहे. आत्मविश्वास वाढेल. मेजवानी मिळेल. स्वप्ने साकार होतील. कुटुंब सुख लाभेल.

वृश्चिक:-(तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  संमिश्र दिवस आहे. विवेक बुद्धीचा वापर कराल. काही सुखद अनुभव येतील. वरिष्ठ खुष होतील. संध्याकाळ आनंदाची.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)  अत्यंत अनुकूल दिवस आहे. मनासारखी कामे होतील. स्वप्नाना नवे पंख फुटतील. संध्याकाळ खर्चात टाकणारी असू शकते.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल दिवस आहे.  धन धान्य वाढेल. नवीन संधी चालून येतील. एकादश चंद्र आनंद आणि उत्साह वाढता ठेवेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा)  नवम स्थानी चंद्र आहे. प्रिय व्यक्तीची भेट होईल. सहल घडेल. वाहन सुख लाभेल. पाणथळ जागेजवळ भाग्योदय होईल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. नेहमीची कामे चालू ठेवा. साडेसातीचा प्रभाव आज जाणवेल. ज्येष्ठ व्यक्तीकडून लाभ होतील.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.