ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
श्रावण शुक्ल दशमी/एकादशी.क्रोधीनाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.०० (भारतीय प्रमाण वेळेनुसार)
“आज आनंदी दिवस आहे” *स्वातंत्र्य दिन, पारशी नवीन वर्ष आरंभ*
चंद्र नक्षत्र – ज्येष्ठा/मूळ.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृश्चिक/(दुपारी १२.५३ नंतर धनु)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा सूर्याशी आणि बुधाशी शुभ योग होणार आहे. दिवसाची सुरुवात काहीशी संथ असली तरी नंतर प्रगतीचा वेग वाढेल. सरकारी सन्मान मिळतील. छोटे प्रवास घडतील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) महत्वाची कामे सकाळी पूर्ण करून घ्या. पाण्यापासून सावध रहा. सामाजिक कार्यात हिरीरीने भाग घ्याल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल ग्रहमान आहे. अभ्यासात उत्तम यश लाभेल. लेखकांना चांगला दिवस आहे. मान सन्मान मिळतील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) प्रगती दायक ग्रहमान आहे. वेळ दवडू नका. वक्तृत्व चमकेल. कलाकारांना यश मिळेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) तुमच्या राशीतील सूर्य आणि बुधाशी चंद्राचा त्रिकोण योग आहे. आनंदी दिवस आहे. स्वप्ने पूर्ण होतील. सन्मान लाभतील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) व्यवसायास पोषक ग्रहमान आहे. प्रगती होईल. व्यापार वाढेल. मात्र सरकारी नियम कसोशीने पाळा.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) चिंता दूर करणारा दिवस आहे. नवीन क्षितिज मोकळे होईल. अडचणी दूर होतील. मार्ग सापडतील. आरोग्य सुधारेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अनुकूल दिवस आहे. सुखद अनुभव येतील. गुंतवणूक वाढेल. वरिष्ठ खुश होतील. नोकरीत चांगले अनुभव येतील.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) दिवसाचा पूर्वार्ध अनुकूल नाही. महत्वाची कामे त्या कालावधीत नकोत. दिवसाचा उत्तरार्ध चांगला आहे. प्रवास आनंददायक होतील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) दिवसाच्या पूर्वार्धात कामे पूर्ण करून घ्या. नंतर दोन दिवस व्यय स्थानी चंद्र आहे. सामान्यपणे दिवस व्यतीत होईल.मन अस्वस्थ राहील आरोग्याची काळजी घ्या विश्रांती घ्या.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) उद्या दुपारनंतर चंद्र अनुकूल होत आहे. आरोग्याचे प्रश्न मिटतील. कामाचा वेग वाढेल. अडकलेली कामे पूर्ण होतील. शत्रू पराभूत होतील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल ग्रहमान आहे. त्याचा लाभ घ्या. आरोग्यात सुधारणा होईल. सामाजिक कार्याची दखल घेतली जाईल. सन्मान मिळेल. व्यवसाय वाढेल.
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)
