आजचे राशिभविष्य गुरूवार,८ ऑगस्ट २०२४

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
श्रावण शुक्ल चतुर्थी. क्रोधीनाम संवत्सर.   
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.०० (भारतीय प्रमाण वेळेनुसार)
“आज सकाळी ११.०० पर्यंत चांगला दिवस आहे” *विनायकी चतुर्थी*
चंद्र नक्षत्र – उत्तरा (फाल्गुना). 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कन्या.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा हर्षलशी शुभ योग आहे. शब्दास मान मिळेल. कर्जे मंजूर होतील. वारसा हक्काने संपत्ती वाढेल. व्यसनाने टाळा. पाण्यापासून काळजी घ्या.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) प्रभावी वक्तृत्व अनुभवास येईल. आत्मविश्वास वाढेल. नवीन संधी चालून येतील. वाहन सुख लाभेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अचानक एखादी खरेदी होईल. घरातून उत्तम सहकार्य आणि पाठिंबा लाभेल. नोकरीच्या ठिकाणी अधिक काळजी घ्यावी.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) भरघोस आर्थिक लाभ होतील. अचानक एखादी सुखद बातमी समजेल. प्रतीक्षा संपेल. कलाकारांना उत्तम यश लाभेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे)  अनुकूल दिवस आहे. बुध – शुक्र युती मन प्रसन्न ठेवेल. उत्साह वाढेल. प्राणयरम्य दिवस आहे. सहल घडेल. चांगले अनुभव येतील.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) तुमच्याच राशीत चंद्र आहे. उत्तम आर्थिक लाभ होतील. प्रवासातून मोठे करार होतील. पत्नीची नाराजी दूर करावी लागेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)  संमिश्र दिवस आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. बेकायदेशीर अर्थ लाभाचा मोह टाळावा लागेल. प्रलोभने समोर येतील. खर्च वाढेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अनुकूल दिवस आहे. आज सुखद अनुभव येतील. गुंतवणूक वाढेल. जोडीदाराचा सल्ला मोलाचा ठरेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) चांगला दिवस आहे. संपत्ती वाढेल.   वाहन सौख्य लाभेल. आर्थिक लाभ होतील. भ्रमंती होईल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) नात्यात दुरावा निर्माण होईल,.मनस्थिती बिघडेल, वरिष्ठ नाराज होतील , प्रवासात अति साहस टाळा.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अष्टम स्थानी चंद्र आहे. घरगुती कामे मार्गी लागतील. हरवलेल्या वस्तू सापडतील. खर्च वाढतील. विनाकारण त्रास होऊ शकतो.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) कोर्ट कामात यश मिळेल. शत्रू पराभूत होतील. लेखक आणि प्रकाशक याना यश मिळेल. पाण्यापासून काळजी घ्या.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय,आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.