ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
पौष कृष्ण षष्ठी. हेमंत ऋतू. शोभन नाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज दुपारी २.०० पर्यंत चांगला दिवस आहे”
चंद्र नक्षत्र – चित्रा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कन्या/तुळ.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) दिवसाचा पूर्वार्ध अनुकूल आहे. कामे पूर्ण करा. उत्तरार्धात नोकरीच्या ठिकाणी आणि प्रवासात वाद टाळा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. कला क्षेत्रात यश मिळेल. आर्थिक बाजू बळकट होईल मात्र जास्त मेहनत करावी लागेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) घर जवळील राहिवाशांशी वाद संभवतात. संयम बाळगावा. वाहन जपून चालवा.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) शत्रू शिरजोर होतील. विनाकारण आरोप होतील. चोरीचे भय आहे. उपासना करा.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) दिवसाची सुरुवात संथ होईल. उत्तरार्धात मोठ्या उलाढाली होतील. हातून उग्र कार्य घडेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आनंद देणारा दिवस आहे. सुरुवात चांगली होणार आहे. कौटुंबिक कार्यक्रमाची आखणी होईल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) दिवसाचा उत्तरार्ध अनुकूल आहे. मात्र अपेक्षित वेग प्राप्त होणार नाही. गृहकलह टाळा. पाळीव प्राण्यांपासून सावध रहा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) पूर्वार्धात सर्व कामे पूर्ण करवून घ्या. उत्तरार्ध आरोग्य विषयक अडचणी निर्माण करणारा आहे.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र दिवस आहे. शक्यतो महत्वाची कामे आज नकोत. उधारी आणि कर्ज घेणे टाळा.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. मनाची स्थिरता राखणे जड जाईल. प्रवासात त्रास संभवतो.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) दिवसाचा उत्तरार्ध दिलासा देणारा आहे. मात्र मोठे करार आज नकोत. कलह टाळा. विवादात माघार घ्यावी लागेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) महत्वाची कामे सकाळी पूर्ण करून घ्या. संध्याकाळी काही जुन्या समस्या मिटतील. अपेक्षित कामे मात्र पूर्ण होणार नाहीत.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)