आजचे राशिभविष्य,गुरूवार,१५ फेब्रुवारी २०२४  

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
माघ शुक्ल षष्ठी. शिशिर ऋतू.शोभन नाम संवत्सर. 
राहुकाळ -दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज चांगला दिवस आहे” 
चंद्र नक्षत्र -अश्विनी/भरणी. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मेष.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) तुमच्याच राशीत चंद्र असून गुरु आणि हर्षल युक्त आहे. अनुकूल शनीशी लाभ योग आहे. अत्यंत उत्तम दिवस आहे. धर्मकार्य कराल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) प्रतिकूल दिवस आहे. फारसे आशादायक चित्र नाही. दानधर्म करण्यास चांगला कालावधी आहे. परदेश प्रवास घडेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अत्यंत उत्तम दिवस आहे. अकल्पित लाभ होतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. दूरचे प्रवास घडतील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कामे वेगाने पुढे सरकण्याचा दिवस आहे. वरिष्ठ खुश होतील. कामाच्या ठिकाणी आश्चर्य कारक बदल जाणवतील.

सिंह:– (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) विद्यार्थ्यांना यश मिळेल. दूरगामी परिणाम करणारे निर्णय होतील. प्रवास घडतील.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अष्टम स्थानी चंद्र, हर्षल, गुरू आहेत. आर्थिक लाभ होतील. जितके दान द्याल त्याच्या कैक पटीने परत येईल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आजपर्यंत केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. ज्याची वाट बघितली ते घडेल. कोर्टात यश  लाभेल. चोरीचे भय मात्र आहे.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आर्थिक दृष्टीने चांगला दिवस आहे. काळजी दूर होईल. आरोग्याची काळजी घ्या. उष्णतेचा त्रास होऊ शकतो.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संततीच्या कडून खुश खबर मिळेल. शेअर्स मध्ये यश मिळेल. विनयशील स्वभावाचा लाभ होईल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) शेतात पाण्याची सोय होईल. विहीर खोदण्यास चांगला दिवस आहे. पूर्वजांचे आशीर्वाद लाभतील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) कला, ज्ञान आणि तंत्र यांत काम करणाऱ्यांसाठी चांगला दिवस आहे. वेळ दवडू नका. छोटे प्रवास घडतील.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) कौटुंबिक सौख्य लाभेल. मन आनंदी राहील. सांपत्तिक वाढ दिसून येईल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521) 

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.