आजचे राशिभविष्य गुरूवार,२२ फेब्रुवारी २०२४

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
 माघ शुक्ल त्रयोदशी/चतुर्दशी. शिशिर ऋतू. शोभन नाम संवत्सर. 
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज चांगला दिवस आहे” *गुरुपुष्यामृत सूर्योदयापासून दुपारी ४.४३ पर्यंत* 
चंद्र नक्षत्र – पुष्य/आश्लेषा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कर्क.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) संमिश्र दिवस आहे. गृहकलह टाळा. धार्मिक कार्यात सहभागी व्हा.उत्पन्नातील काही भाग जरूर दानधर्म करा.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) प्रतिकूल दिवस आहे. आध्यात्मिक लाभ होतील. प्रवासात अडचणी निर्माण होतील. नियोजन बदलेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे.  वाहन काळजीपूर्वक चालवावे. महत्वाचे निर्णय आज नकोत. वस्तू सांभाळा.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) सप्तम स्थानातील मंगळशी आणि शुक्राशी चंद्राचा प्रतियोग आहे. विनाकारण वादविवाद टाळा. पत्नीशी मतभेद संभवतात.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) प्रतिकूल दिवस आहे. आरोग्य विषयक प्रश्न निर्माण होतील. मन अस्थिर राहील. खर्च वाढतील.

कन्या:– (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल दिवस आहे. रत्ने खरेदी होईल. व्यावसायिक अंदाज चुकतील. प्रेमात धोका संभवतो.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कामाच्या ठिकाणी अधिक ताण पडेल. वाहन दुरुस्ती करावी लागेल. भागीदारीत यश मिळेल. पत्नीचा सल्ला मोलाचा ठरेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) प्रवासाचे बेत आखाल. कलाकारांना उत्तम यश मिळेल. आर्थिक बाजू भक्कम होईल. कनिष्ठ कर्मचारी नाराज होतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अष्टम स्थानी चंद्र आहे. मौल्यवान खरेदी होईल. स्त्री धनात वाढ होईल. घशाची काळजी घ्या.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) क्रोधावर नियंत्रण आवश्यक आहे. शत्रूंचा त्रास जाणवेल. कोर्ट कामात यश मिळणार नाही. मेजवानीचे योग आहेत.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) फारशी अनुकूलता नाही. खर्चात वाढ होणार आहे. शक्यतो आराम करावा. दंड होऊ शकतो. व्यसने टाळा.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) स्वप्नपूर्ती करणारा दिवस आहे. खरेदी होईल. प्रिय व्यक्ती भेटेल. दिवस आनंदात व्यतीत होईल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)  

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!