आजचे राशिभविष्य गुरूवार,४ जुलै २०२४ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशी.ग्रीष्म ऋतू.क्रोधीनाम संवत्सर.  
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज चतुर्दशी वर्ज्य दिवस आहे”*शिवरात्री*  
चंद्र नक्षत्र – मृग. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी -वृषभ/ (दुपारी ३.५८ नंतर) मिथुन.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) स्वभावात बदल घडतील. आत्मचिंतन कराल. कौटुंबिक मतभेद संभवतात. संयम ठेवा.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) चंद्राचा शनिशी केंद्र योग आहे. व्यापारात लाभ होईल. स्पर्धेत बाजी माराल. मात्र नोकरीत विसंवाद होऊ शकतो.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) दिवसाचा पूर्वार्ध अनुकूल नाही. खर्चात वाढ होईल. प्रवासात त्रास सांभावतो. संध्याकाळ मात्र आनंदाची.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) पूर्वार्ध अनुकूल आहे. तुमचा आत्मविश्वास आज वाढणार आहे. शत्रू माघार घेतील. संध्याकाळ खर्चात टाकणारी.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) नोकरीत तीव्र स्पर्धा जाणवेल. आज काही ठिकाणी माघार घेण्यास हरकत नाही. संध्याकाळ अनुकूल आहे.

कन्या:– (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. खर्चात वाढ दर्शवते. विनाकारण वाद होऊ शकतात. संयम ठेवा.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) सकाळी अष्टम स्थानी चंद्र आहे.  आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. संतती ची काळजी घ्या. शेअर्स मध्ये जोखीम नको.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  सुरुवात चांगली होणार आहे. प्रिय व्यक्तीसाठी खर्च कराल. दुपारनंतर काळजी घ्या. स्वतःची फसवणूक टाळा.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आर्थिक आवक चांगली होईल. मात्र अनामिक भीती दाटून येईल. आत्मविश्वास कमी होईल. श्री. हनुमान उपासना करा.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे. कौटुंबिक मतभेद संभवतात. मुलांशी संवाद साधा. आर्थिक बाजूची चिंता नको.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) तुमच्या राशीतील शनीचा चतुर्थ चंद्राशी केंद्र योग आहे. घरगुती बाबतीत विश्वासाचे वातावरण निर्माण करा. आर्थिक नियोजन काटेकोर करा.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) प्रतिकूल शनीची दाहकता आज जाणवू शकते. आर्थिक व्यवहार जपून करा. मौल्यवान वस्तू सांभाळा.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.