आजचे राशिभविष्य गुरूवार,२७ जून २०२४  

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
ज्येष्ठ कृष्ण षष्ठी. वर्षा ऋतू. क्रोधीनाम संवत्सर. 
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज संध्याकाळी ७.०० पर्यंत चांगला दिवस आहे”  
चंद्र नक्षत्र – शततारका. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कुंभ.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अत्यंत अनुकूल दिवस आहे. चंद्राचे बळ आहे. महत्वाची कामे आज जरूर पूर्ण करा. नवीन वस्तू खरेदी होईल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कामाच्या ठिकाणी उत्तम अनुभव येईल. मन उत्साही राहील. प्रगती होईल. योग्य दिशेने मार्गक्रमण कराल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल दिवस आहे. भाग्योदय होईल. सर्व कार्यात यशस्वी व्हाल. मेहनत वाढवावी लागेल. प्रवास घडतील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र दिवस आहे. ग्रहमान बऱ्या पैकी अनुकूल आहे. मन प्रसन्न राहील हरवलेली वस्तू सापडेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) नोकरी व्यवसायात संमिश्र अनुभव येतील. सरकारी कामात यश मिळेल. पत्नीची मोलाची मदत मिळेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक लाभ होतील. प्रवास कार्यसाधक होतील. समाधानकारक प्रगती होईल. कामे मार्गी लागतील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) पंचम चंद्र अनेक आशादायक आणि आनंदी क्षण घेऊन येईल. संतती कडून चांगली बातमी समजेल. गुंतवणूक वाढेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  घरगुती गोष्टीत वेळ व्यतीत होईल. प्रिय व्यक्तीची मर्जी प्राप्त होईल. पाण्याजवळ भाग्योदय होईल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आर्थिक बाजू मजबूत होईल. विजयी मार्गक्रमण कराल. शत्रूचा त्रास कमी होईल. गुपिते उघड करू नका.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) चांगला दिवस आहे. अनुकूल राहू भरघोस यश देईन. विनाकारण धाडस नको. प्रेमात परीक्षा घेतली जाईल.

कुंभ:– (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा)  तुमच्याच राशीत चंद्र आहे. मंगळ, बुध, शुक्राशी चंद्राचा शुभ योग आहे. अत्यंत अनुकूल दिवस आहे. कामे मार्गी लावा. नवीन व्यवसाय सुरू कराल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. काही सुखद अनुभव येतील. कलाकारांना संधी मिळतील. सरकारी कामे मार्गी लागतील.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.