आजचे राशिभविष्य गुरूवार,६ जून २०२४   

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
वैशाख अमावस्या. ग्रीष्म ऋतू. क्रोधीनाम संवत्सर.  
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज वर्ज्य दिवस आहे”  *दर्श – भावुका अमावस्या, शनिश्चर जयंती*
चंद्र नक्षत्र – रोहिणी. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृषभ.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल दिवस आहे. कलाकारांना चांगले लाभ मिळतील. प्रतिष्ठा वाढेल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) वक्तृत्व चमकेल. तुमचा प्रभाव वाढेल. कीर्ती पसरेल. दबदबा वाढेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे. विनाकारण खर्च वाढू शकतात. मान अपमानाचे प्रसंग येऊ शकतात. भेटवस्तू मिळतील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अनुकूल ग्रहमान आहे. चंद्राची शुक्राशी युती आहे. मन आनंदित करणाऱ्या घटना घडतील. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) सरकारी कामे मार्गी लागतील. नोकरी व्यवसायात संमिश्र अनुभव येतील. भिन्न लिंगी व्यक्ती कडून लाभ होतील.

कन्या:– (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) घरातील जेष्ठ व्यक्तीकडून लाभ होतील. चर्चेतून मार्ग निघेल. भाग्योदय होईल. उपासना फळास येईल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अत्यंत सांभाळून पावले टाकावी लागतील. कोणताही धोका पत्करू नका. प्रतिष्ठा पणास लागेल. काळजी घ्या.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  सप्तम स्थानी अमावस्या आहे. पत्नीची काळजी घ्या. प्रिय व्यक्तीचा काही काळ दुरावा सहन करावा लागू शकतो.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आरोग्याचे प्रश्न सुटतील. आर्थिक बाजू मजबूत होईल. मौल्यवान वस्तू सांभाळा. नैतिकता सोडू नका.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) मोठी गुंतवणूक टाळावी. करार करताना काळजी घ्यावी. नुकसान संभवते. प्रेमात यश मिळेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा)  चतुर्थ चंद्राशी शनीचा केंद्र योग आहे. घरगुती वादविवाद होऊ शकतात. शेतात काम करताना काळजी घ्या. राजकीय भाष्य टाळा.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल दिवस आहे. लेखकांना यश मिळेल. वृत्तपत्रात प्रसिद्धी मिळू शकते. कला प्रांतात नाव कमवाल.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.