आजचे राशिभविष्य गुरूवार,२ मे २०२४  

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
चैत्र कृष्ण नवमी. ग्रीष्म ऋतू.क्रोधीनाम संवत्सर.  
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज उत्तम दिवस आहे”  
चंद्र नक्षत्र – धनिष्ठा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मकर/(दुपारी २.३३ नंतर )कुंभ.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) कामाचा वेग वाढेल. कुटुंब सुखाला महत्व द्या. काही अनपेक्षित घटना घडतील. दुपारनंतर चंद्र अधिक अनुकूल होईल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) तुमच्या राशीत गुरू चे आगमन झालेले आहे. मात्र प्रतिकूल हर्षल एखादी समस्या निर्माण करेल. खचून जाऊ नका.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) दुपार नंतर अनुकूल दिवस आहे. काही सुखद अनुभव येतील. धार्मिक कार्यासाठी खर्च कराल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) सकाळच्या सत्रात महत्वाची कामे पूर्ण करा.  नोकरीत काही समस्या निर्माण हौउ शकतात. मात्र अनुकूल गुरू सर्व अडचणी दूर करेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूल दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. मात्र खर्च देखील वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी काळजी घ्या.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. घरातील जेष्ठ व्यक्तीची काळजी घ्या. प्रवास घडतील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) प्रगती करक दिवस आहे. अडलेली कामे मार्गी लागतील. जोडीदाराची काळजी वाटेल. धार्मिक कामासाठी खर्च होईल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  चांगला दिवस आहे. अर्थकारण उत्तम चालणार आहे. मात्र पत्नीची काळजी वाटेल. आरोग्य सांभाळा.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) घरगुती समस्या डोके वर काढतील. मतभेद जाणवतील. नातेवाईक भेटतील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल दिवस आहे. मेजवानी मिळेल. सकाळची वेळ अधिक अनुकूल आहे. सामाजिक कार्यात काहीसा त्रास संभवतो.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा)  सकाळच्या सत्रात कामे जपून करा. हाताची काळजी घ्या. दुपार नंतर अनुकूल कालावधी आहे. ध्यानधारणा करा.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) सकाळच्या वेळेत कामे पूर्ण करा. नोकरीत एखादा विचित्र अनुभव येईल. मनस्थिती बिघडू शकते.

(कुंडलीवरून करियर,लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.