आजचे राशिभविष्य गुरूवार,१४ नोव्हेंबर २०२४

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
कार्तिक शुक्ल त्रयोदशी/चतुर्दशी.हेमंत ऋतू.क्रोधीनाम संवत्सर.   
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज क्षय तिथी आहे” *वैकुंठ चतुर्दशी* आवळी पूजन व भोजन.अवळीचे झाडाखाली विष्णू पूजन.
चंद्र नक्षत्र – अश्विनी. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मेष.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521) 

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा मंगळाशी केंद्र योग्य आहे. फारशी अनुकूलता नाही. सरकारी कामे अपूर्ण राहतील. विलंब अनुभवाल. संयम ठेवा.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. प्रलोभने टाळा. व्यसने नकोत. प्रेमत अपयश संभवते.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल दिवस आहे.  नोकरीतील अनुभवाचा फायदा होईल. नवीन संधी मिळतील. भेटवस्तू मिळतील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) दशम चंद्र आहे. कामाचा ताण वाढेल. नोकरीत काही चांगले अनुभव येतील.  क्रोधास आवरावे लागेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) दूरचे प्रवास होतील. मन आनंदी राहील अडचणी दूर होतील. खर्च मात्र वाढतील.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र ग्रहमान आहे. काही बाबतीत प्रतिकुलता आहे. गरजूना मदत करा. दुपारनंतर काहीशी प्रगती साधाल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आज कामे पूर्ण करा. मोठी गुंतवणुक आज टाळा. व्यावसायिक प्रतिस्पर्धी माघार घेतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  आर्थिक प्रगती होईल. अडथळे दूर होतील. व्यावसायिक जागेत बदल संभवतो.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अनुकूल ग्रहमान आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. जुनी येणी वसूल होतील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) मन उत्साही राहील. मात्र शत्रूचा त्रास जाणवेल. कोर्टात अपेक्षित यश मिळणार नाही. संयम ठेवावा लागेल.,आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) मन आनंदी राहील. सौख्य लाभेल. व्यवसाय वाढेल. अर्थकारण मजबूत होईल. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल दिवस आहे. दिवसभरात महत्वाची कामे पूर्ण करा. आर्थिक लाभ होतील. जुनी येणी वसूल होतील.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!