आजचे राशिभविष्य गुरूवार,२१ नोव्हेंबर २०२४ 

0

राहूकाळ- दुपारी ३.०७ ते ४.३०
गुरुपुष्यामृत योग सकाळी ६.५२ पासून दुपारी ३.३४ पर्यंत 
“आज दुपारी ४.०० पर्यंत चांगला दिवस” 
चंद्र नक्षत्र – पुष्प 

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) उत्तम दिवस आहे. अनेक लाभ संभवतात. आळस झटकून कामाला लागा.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कोर्ट कामासाठी चांगला दिवस आहे. शत्रू पराभूत होतील. व्यावसायिक यश लाभेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनेक प्रश्न सुटतील. कामे मार्गी लागतील. आरोग्यात सुधारणा होईल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो)  आर्थिक प्रश्न सुटतील. गूढ उलगडतील. सन्मान प्राप्त होतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) सामाजिक कार्यात भाग घ्याल. यःस मिळेल. कीर्ती पसरेल. धनप्राप्ती होईल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संभ्रम अवस्था निर्माण होईल. नात्यातून उत्तम सहकार्य मिळेल. शेजाऱ्यांशी वाद टाळा.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) महत्वाच्या कार्यात दिरंगाई जाणवेल. चुकीची औषधयोजना होऊ शकते. कौटुंबिक वाद संभवतात.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) उत्तम दिवस आहे. दबदबा वाढेल. सन्मान मिळतील. मोजके बोलणे हिताचे आहे.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) दीर्घकालीन लाभाचे परिणाम मिळतील. कामाचा ताण वाढेल मात्र त्यातून लाभ होतील.

मकर:– (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) मत्सर त्रास जाणवेल. मोठे निर्णय घेताना योग्य काळजी घ्या. पत्नीशी मतभेद नकोत.

कुंभ:– (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) प्रतिकूल दिवस आहे. मोठे निर्णय नकोत. व्यवसाय/नोकरीत काळजी घ्या. शाब्दिक घोळ नको.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अत्यंत उत्तम दिवस आहे. अनुकूल रवी, मंगळ तुम्हाला राजकीय आणि सर्वच क्षेत्रात यश प्रदान करतील.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.