आजचे राशिभविष्य गुरूवार,१७ ऑक्टोबर २०२४

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
अश्विन पौर्णिमा. शरद ऋतू. क्रोधीनाम संवत्सर.   
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज चांगला दिवस आहे” *कार्तिक स्नान आरंभ*
चंद्र नक्षत्र – रेवती/ (दुपारी ४.२० नंतर ) अश्विनी. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मीन/ (दुपारी ४.२० नंतर) मेष. विष्टी करण शांती.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)  

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) फारशी अनुकूलता नाही. सरकारी कामे अपूर्ण राहतील. विलंब अनुभवाल. धर्म कार्य कराल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) सकाळच्या सत्रात कामे पूर्ण करा. धार्मिक यात्रा करण्यासाठी उत्तम कालावधी आहे. संध्याकाळ चिंता वाढवणारी ठरेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल दिवस आहे.  नोकरीतील अनुभवाचा फायदा होईल. नवीन संधी मिळतील. जेष्ठ व्यक्तीची सेवा करा.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) दूरचे प्रवास होतील. मन आनंदी राहील अडचणी दूर होतील. खर्च मात्र वाढतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र ग्रहमान आहे. सकाळच्या सत्रात प्रतिकुलता आहे. गरजूना मदत करा. दुपारनंतर काहीशी प्रगती साधाल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) सकाळच्या सत्रात कामे पूर्ण करा. दुपारनंतर मोठी गुंतवणुक आज टाळा. व्यावसायिक प्रतिस्पर्धी माघार घेतील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक प्रगती होईल. अडथळे दूर होतील. व्यावसायिक जागेत बदल संभवतो.

वृश्चिक:– (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  अनुकूल ग्रहमान आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. जुनी येणी वसूल होतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) मन उत्साही राहील. मात्र शत्रू त्रास जाणवेल. कोर्टात अपेक्षित यश मिळणार नाही. संयम ठेवावा लागेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) मन आनंदी राहील. सौख्य लाभेल. व्यवसाय वाढेल. अर्थकारण मजबूत होईल. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अनुकूल दिवस आहे. दिवसभरात महत्वाची कामे पूर्ण करा. आर्थिक लाभ होतील. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) ग्रहमान अनुकूल आहे. वाहन सुख लाभेल. व्यापारात लाभ होतील.  छोटे प्रवास घडतील.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.