आजचे राशिभविष्य गुरूवार,१२ सप्टेंबर २०२४

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
भाद्रपद शुक्ल नवमी. क्रोधीनाम संवत्सर.   
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.०० (भारतीय प्रमाण वेळेनुसार)
“आज चांगला दिवस आहे” *अ:दुःख नवमी, गौरी विसर्जन (रात्री ९.५३ पर्यंत)* दोरे घेणे, भागवत सप्ताह आरंभ. 
चंद्र नक्षत्र – मूळ. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – धनु.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा बुधाशी शुभ योग आहे. वाहन सौख्य लाभेल. दूरचे प्रवास घडतील. नात्यात गैरसमज टाळा. धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. कठोर बोलणे कटाक्षाने टाळावे. पशूंपासून काळजी घ्या.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आर्थिक आवक चांगली होईल. मान सन्मान मिळतील. कोर्ट कामात दिरंगाई जाणवेल. शत्रू वाढतील. लेखकांना यश मिळेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अनुकूल दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. काही सुखद अनुभव येतील. खर्चात वाढ होईल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) तणाव कमी होतील. अडचणी दूर होतील. परदेश प्रवासाचे नियोजन बदलेल. दबदबा वाढेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उत्तम आर्थिक लाभ होतील. अनुकूल राशीस्वामी बुध चंद्राशी शुभ योग् करत आहे. बौद्धिक क्षेत्रात उजळून निघाल. खरेदी होईल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)  संमिश्र दिवस आहे. प्रवासातून लाभ होतील. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना अनुकूल ग्रहमान आहे. स्वतःसाठी खर्च कराल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) मनाची स्थिरता वाढेल. कौटुंबिक कार्यात सहभागी व्हाल. आत्मविश्वास वाढेल. नोकरी/व्यवसायात अधिक मेहनत करावी लागेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) तुमच्याच राशीत चंद्र आहे. प्रवास कार्यसाधक होतील. कोर्ट कामात अपयश दर्शवते. विनाकारण शत्रुत्व नको.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे. मन अस्वथ राहील . व्यय स्थानी चंद्र आहे. अधिकार वाढतील. नवीन जबाबदारी अंगावर येईन. भ्रमंती घडेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) नोकरी/ व्यवसायासाठी चांगला दिवस आहे. कामे मार्गी लागतील. स्वप्ने साकार होतील. शेअर्स मधून लाभ होतील.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची)  अनुकूल ग्रहमान आहे. गुंतवणुकीतून लाभ मिळतील. छोटे प्रवास घडतील. बुद्धिमान वर्तुळात वावर वाढेल.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.