ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
श्रावण शुक्ल अष्टमी. वर्षा ऋतू.
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
“आज सकाळी ११.०० नंतर चांगला दिवस आहे” *दुर्गाष्टमी*
नक्षत्र – विशाखा/अनुराधा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृश्चिक.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अष्टम स्थानी चंद्र आहे. सांभाळून पावले टाका. विसंगती टाळा. शब्द जपून द्या. मोठी कर्जे नकोत.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) मोठया घडामोडी घडतील. अचानक लाभ होतील. पशु प्रेम उफाळून येईल. जमीन व्यवहार पुढे ढकलले जातील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आर्थिक लाभ होतील. मन मोठे करावे लागेल. खर्च देखील वाढणार आहेत. लेखकांना सावध रहावे लागेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) दूरचे प्रवास संभवतात. अचानक लाभ होतील. चांगली बातमी समजेल. कमी बोलणे हिताचे आहे.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) बौद्धिक क्षमता वाढतात. नेतृत्व कराल. पुढाकार घ्यावा लागेल. नोकरीच्या ठिकाणी काही अडचणी येऊ शकतात.
कन्या:– (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक घडी बसेल. आवक वाढेल. व्यापार वृद्धीगत होईल मात्र खर्च देखील वाढेल. प्रवास घडतील.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल बुधाशी चंद्राचा केंद्र योग आहे. प्रगती होईल. व्यापार वाढेल. वादविवाद टाळा. मौल्यवान वस्तू सांभाळा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) प्रथम चंद्र गुरूच्या आणि नंतर शनीच्या नक्षत्रात असणार आहे. भगिदरी व्यवसायात दीर्घकालीन परिणाम करणाऱ्या घटना घडतील. कोर्ट काम पुढे ढकलावे
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) व्यय स्थानी चंद्र आहे. महत्वाची कामे सकाळच्या सत्रात पूर्ण करा. प्रवासात त्रास होऊ शकतो. वाहन दुरुस्ती करावी लागेल.
मकर:– (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) चंद्र अनुकूल आहे. आध्यात्मिक लाभ होतील. स्वप्न साकार होतील. महत्वाची कामे आज पूर्ण करा. मात्र प्रगती संथ राहील.
कुंभ:– (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) घरगुती कामात व्यस्त राहाल. घरात काही मोठे बदल कराल. कुटुंबास वेळ द्याल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल ग्रहमान आहे. वेळेत कामे पूर्ण करा. अर्थलाभ होईल. वाहन व्यवहारात यश मिळेल.
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)
