आजचे राशिभविष्य मंगळवार,६ ऑगस्ट २०२४ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक. 

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक. 
श्रावण शुक्ल द्वितीया. वर्षा ऋतू.
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 
“आज चांगला दिवस आहे” *मंगळागौरी पूजन*
नक्षत्र – मघा/पूर्वा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – सिंह.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) प्रवास घडतील. नात्यातील कोणाचे परदेश गमन घडू शकते. कठोर बोलणे टाळावे. आज कर्ज घेऊ नये.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) वाहन सुख लाभेल. अधिकार गाजवाल. पाळीव पशूंचा लाभ/सहवास घडेल. क्रोधावर नियंत्रण ठेवा.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अर्थकारण मजबूत होईल. काही सुखद घटना घडतील. संगणक क्षेत्रात यश लाभेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) मंगळ, गुरू, हर्षल अनुकूल आहेत. याचा लाभ घ्या. आळस झटकून कामाला लागा. अचानक लाभ होतील. अंदाज अचूक ठरतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे)  तूमच्याच राशीत चंद्र बुधाच्या युतीत आहे. बौद्धिक आणि गणिती क्षेत्र गाजवाल. नोकरीत वरिष्ठाचा त्रास जाणवेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आज फारशी अनुकूलता नाही. पेटंट, वकिली यातून लाभ होतील. न्याय मिळेल. खर्च वाढतील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल ग्रहमान आहे. मनासारखी कामे होतील. मात्र संयम बाळगावा लागेल. अडलेली कामे मार्गी लागतील. संधी चालून येतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) क्रोध आवरवा लागेल. शत्रूचा त्रास जावे. राजकीय यश जरासे दूर राहील. कोर्टात निराशा होऊ शकते. कामानिमित्त प्रवास घडतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) नवम स्थानी चंद्र आहे. दूरचे प्रवास होतील. परदेश गमन संभवते. वाहन जपून चालवा. नियोजन चुकू शकते.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अष्टम स्थानी चंद्र आहे. जपून वाटचाल करा . संततीशी वाद संभवतात.यंत्र हाताळताना काळजी घ्या. प्रवासात त्रास संभवतो.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) जोडीदारासाठी प्रवास करावा लागेल. नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूची खरेदी होईल. रसायने/औषधे हाताळताना काळजी घ्या.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) व्यवसायात लाभ होतील. जुन्या योजना आकारास येतील. भावाशी वाद संभवतो. अति आत्मविश्वास नको.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.