आजचे राशिभविष्य मंगळवार, २६ डिसेंबर २०२३

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
मृगशीर्ष पौर्णिमा. हेमंत ऋतू.
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 
“आज संध्याकाळी ६.०० नंतर चांगला दिवस” *श्री. दत्तात्रय जयंती* 
नक्षत्र – मृग. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृषभ/मिथुन.   
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)  अनुकूल दिवस आहे. चंद्राचा शिणीशी शुभ योग आहे. शनी अनुकूल आहे. दीर्घकालीन फायद्याची कामे होतील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) धन स्थानी जाणारा चंद्र रवी आणि बुधाशी प्रतियोग करत आहे. जेष्ठ व्यतीची काळजी घेणे आवश्यक आहे.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) शत्रू शिरजोर होणार आहे. कोर्ट कामात दिरंगाई जाणवेल. कामे पुढे ढकलली जातील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) प्रतिकूल दिवस आहे. व्यय स्थानातील चंद्र खर्चात वाढ दर्शवतो आहे. मौल्यवान वस्तू सांभाळा. चोरीचे भय आहे.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. विवाह इच्छुकांना खुश कबर मिळेल. कोर्टात यश लाभेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो)  घरगुती आघाडीवर लक्ष घालावे लागेल. शेजाऱ्याशी वाद संभवतो. पाळीव प्राण्यापासून काळजी घ्या.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) उत्तरार्ध चांगला आहे. दिवसाची सुरुवात संथ होणार आहे. नंतर कामाचा वेग वाढेल. शेअर्स मधून लाभ संभवतात.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. महत्वाची कामे आज नकोत. धार्मिक कार्यात सहभागी व्हा.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) बुद्धिभ्रम होण्याची शक्यता आहे. कायदेशीर कामे पुढे ढकलली जातील. चुकीचे निर्णय घेऊ नका.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) प्रतिकूल दिवस आहे. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. परदेश प्रवासात अडचणी येतील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) पंचमातील चंद्राशी स्वराशीतील शनीचा शुभ योग आहे. अचानक लाभ होऊ शकतात. दीर्घकालीन गुंतवणूक करा.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) नोकरीत कामाचा ताण वाढेल. वरिष्ठ नाराज होऊ शकतात. घरासाठी वेळ द्यावा लागेल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.