आजचे राशिभविष्य मंगळवार,२० फेब्रुवारी २०२४ 

 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
माघ शुक्ल एकादशी/द्वादशी.शशिर ऋतू.
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 
“आज सकाळी १०.०० नंतर चांगला दिवस आहे“जया एकादशी “ घबाड दुपारी १२.१३ नंतर. सूर्याचा शततारका प्रवेश. 
नक्षत्र – आर्द्रा/पुनर्वसू. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी -मिथुन.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) तुमच्या राशीतील हर्षलशी चंद्राचा लाभ योग आहे. अचानक धनलाभ होईल. आर्थिक बाजू भक्कम होईल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कुटुंबासाठी खर्च कराल. दिवसाचा उत्तराध धार्मिक आचरण करायला लावणारा आहे. धनवृद्धी होईल.

मिथुन:– (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अत्यन्त उत्तम दिवस आहे. अचानक मोठे घबाड हाती लागेल. व्यापारात यश.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) वरिष्ठ साठी खर्च करावा लागेल. नोकरीत चांगला अनुभव येईल. सहकार्य लाभेल. उत्तराध शुभ कार्याचा आहे.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूल दिवस आहे. विज्ञानातून यश लाभेल. राजकृपेचा अनुभव येईल. उच्च शिक्षणात यश.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) व्यावसायिक तणाव कमी होईल. नोकरीतील चिंता दूर होतील. वितुष्ट मिटेल. पत्नीकडून लाभ होतील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कोर्ट कामात यश मिळेल. वाद मिटल्याने शत्रूकडून लाभ होतील. खरेदी -विक्री व्यवसायात उत्तम यश मिळेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) फारशी अनुकूलता नसली तरी प्रगती होत राहणार आहे. मात्र दगदग वाढेल. विनाकारण प्रवास घडेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अचानक लाभ होतील. शेअर्स मध्ये नशीब अजमावून बघण्यास हरकत नाही. प्रतिस्पर्धी गारद होतील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) सुपीक जमिनीचे व्यवहार होतील. शेतीत वाढ होईल. आर्थिक लाभ होतील. स्थानात बदल घडेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) पराक्रम गाजवण्याचा दिवस आहे. आधी राहू आणि नंतर गुरूच्या नक्षत्रातील चंद्र कष्ट अन त्याचे फळ देईल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) धन धान्य यात वाढ होईल. वास्तूचे प्रश्न मिटतील. सोने खरेदी होईल. भूमिगत द्रव्ये यातून लाभ होतील.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)  

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!