ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
माघ कृष्ण तृतीया.शिशिर ऋतू.
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
“आज दुपारी १.०० पर्यंत चांगला दिवस आहे”
नक्षत्र – हस्त.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कन्या.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आर्थिक दृष्टीने उत्तम दिवस आहे. सौख्य लाभेल. भिन्न लिंगी व्यक्ती कडून लाभ होतील. कामाच्या ठिकाणी मन रमेल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अत्यंत अनुकूल दिवस आहे. मनासारखी कामे होतील. शेअर्स मधून लाभ होतील. प्रवास घडतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) गृह सजावट होईल. बाग बगीचा यांच्याशी संबंध येईल. चैनीवर खर्च कराल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) व्यावसायिक वजन वाढेल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. खूशखबर मिळेल. विवाह इच्छुकांना यश लाभेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कौटुंबिक सुखात रममाण व्हाल. एकत्र कुटुंबात छोटी सहल ठरेल. आर्थिक बाजू मजूर होईल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) तुमच्याच राशीत चंद्र आहे. पंचमातील शुक्र, मंगळ यांच्याशी शुभ योग आहे. उत्तम लाभ होतील. शेअर्स मधून नफा वाढेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र दिवस आहे. काही सुखद घटना घडतील. फुले, झाडे यांची आवड जपाल. त्यासाठी विशेष कष्ट घ्याल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अत्यंत अनुकूल दिवस आहे. सुखद अनुभूती मिळेल. यशाची शिखरे सर कराल. भावंड मदत करतील.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) काम आणि कौटुंबी यात समतोल राखाल. कलाकारांना संधी चालून येतील. प्रगती होईल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) राजकीय परिपकवता कामास येईल. उत्तमरित्या संकल्प तडीस न्याल. रसिकता अनुभवाल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अजूनही अनुकूलता नाही. मन अस्थिर रेल. महत्वाचे निर्णय आज नकोत. तीर्थाटन घडेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) सप्तमात चंद्र आणि अनुकूल शुक्र. प्रणयरम्य आणि आनंदी दिवस आहे. स्वप्ने साकार होतील. खरेदी घडेल.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
