आजचे राशिभविष्य मंगळवार,२ जुलै २०२४ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
ज्येष्ठ कृष्ण एकादशी/द्वादशी. वर्षा ऋतू. 
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 
“आज कृतिका वर्ज्य दिवस आहे” *योगिनी एकादशी*
नक्षत्र – कृतिका. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मेष/ (११.१४ नंतर) वृषभ. 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्र – बुध लाभ योग आहे. उत्तम अर्थप्राप्ती होईल. कामे मार्गी लागतील. उत्साह वाढेल. वक्तृत्व गाजेल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) पूर्वार्ध फारसा अनुकूल नाही. दिवसाची सुरुवात संथ होणार आहे. उत्तरार्ध अधिक चांगला आहे. मात्र चुका टाळाव्या लागतील.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) पूर्वार्धात चांगला दिवस आहे. कामाच्या ठिकाणी गतिमानता जाणवेल. जमीन व्यवहारातून लाभ होतील. उत्तरार्ध खर्चात टाकणारा.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) दिवसाचा उत्तरार्ध चांगला आहे.  कलाकारांना चांगला प्रतिसाद मिळेल. परीक्षा यशस्वीपणे द्याल. व्यवसायात वाढ होईल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) खरेदी होईल. मेजवानी मिळेल. जुने आप्त /मित्र भेटतील. धनधान्य यांची रेलचेल असेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अष्टम स्थान सकाळी चंद्र आहे. काहीसा कामाचा ताण जाणवेल. अडचणी दूर होतील. मार्ग दिसेल.उत्तरार्ध दिलासा देणारा असेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) प्रतिकूल दिवस आहे. आध्यात्मिक लाभ होतील. अचानक एखादा खर्च समोर येईल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अनुकूल दिवस आहे. स्वप्ने साकार होतील. कामे मार्गी लागतील. वेळेचा सदुपयोग करा. प्रेमात धोका संभवतो.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)संतती कडून चांगली बातमी समजेल. शेअर्स मध्ये यश मिळेल. अंदाज अचूक ठरतील.

मकर:– (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) उच्च शिक्षणात यश मिळेल. कीर्ती पसरेल. सन्मान होतील. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अर्थप्राप्ती होईल. घरगुती वादविवाद टाळा. संवाद वहनातून लाभ होतील. कनिष्ठ मंडळी सहकार्य करतील.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आरोग्यचे प्रश्न सुटतील. व्यापार वाढेल. व्यावसायिक यश मिळेल. उत्तरार्ध आथिर्क लाभाचा.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!