आजचे राशिभविष्य मंगळवार, २५ जून २०२४

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
ज्येष्ठ कृष्ण चतुर्थी.ग्रीष्म ऋतू. 
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 
“आज सकाळी ९.०० नंतर चांगला दिवस आहे” *अंगारकी चतुर्थी* चंद्र उदय (मुंबई) रात्री १०.२८ (नाशिक) १०.२५ पुणे १०.२३
नक्षत्र – श्रवण. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मकर.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) वरिष्ठ खुश होतील. नोकरीत उत्तम लाभ होतील. भिन्न लिंगी व्यक्तीकडून सहकार्य मिळेल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) प्रवास घडतील. अनपेक्षित लाभ होतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आत्मविश्वास वाढेल.

मिथुन:– (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अष्टम स्थानी चंद्र आहे. सांभाळून पावले टाका. प्रिय व्यक्तीसाठी खर्च कराल. पत्नीची काळजी घ्या.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उत्तम ग्रहमान आहे. भेटवस्तू मिळतील. सन्मान होतील. कीर्ती पसरेल. प्रिय व्यक्ती भेटेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे)  अर्थलाभ होईल. नोकरीत मनासारखे बदल घडतील. महिलांकडून सहकार्य मिळेल. अर्थलाभ होईल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अकल्पित लाभ होतील. शेअर्स मध्ये यश मिळेल. प्रेमात यश लाभू शकते. दानधर्म कराल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) घरगुती कामात व्यस्त व्हाल. गृहसजावट कराल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. न्याय मिळेल.

वृश्चिक:– (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) तृतीय चंद्र उत्तम अर्थ लाभ मिळवून देतील. राजकीय यश लाभेल. पत्नीची प्रसन्नता आनंदित करेल. आदर मिळेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कौटुंबिक सौख्य लाभेल. उधारी वसूल होईल. स्थावर संपत्ती वाढेल. वारसा हक्काचे प्रश्न सुटतील.

मकर:– (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) तुमच्याच राशीत चंद्र आहे. आत्मविश्वास वाढेल. संतती बाबत शुभ समाचार समजतील. अचानक लाभ होतील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) व्यय स्थानी चंद्र आहे. घरगुती कामात वेळ व्यतीत होईल. मोठी कामे आज नकोत.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल दिवस आहे. ज्याची वाट बघत होतात ती संधी चालून येईल. प्रतीक्षा संपेल. मौल्यवान खरेदी कराल.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.