आजचे राशिभविष्य मंगळवार,१० सप्टेंबर २०२४ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
भाद्रपद शुक्ल सप्तमी शरद ऋतू. 
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 
“आज उत्तम दिवस आहे” *गौरी आवाहन (संध्याकाळी ८.०४ पर्यंत)*
नक्षत्र – अनुराधा/ ज्येष्ठ. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृश्चिक.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521) 

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अष्टम स्थानी चंद्र आहे. चंद्राचा शुक्राशी लाभ योग आहे. धनप्राप्ती होईल पण मनस्वास्थ बिघडेल,जवळच्या माणसाला दुखावल्याचे दुःख जाणवेल.

वृषभ:– (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अनुकूल दिवस आहे. प्रेमात यश मिळेल. विवाह इच्छुकांना चांगली बातमी समजेल. लॉटरी मध्ये यश मिळू शकते.

मिथुन:– (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आर्थिक लाभ होतील. मन मोठे कराल.गृह सजावट होईल. जमीन व्यवहारात यश मिळेल. वस्त्र खरेदी होईल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) प्रवास संभवतात. अचानक लाभ होतील. चांगली बातमी समजेल. दागिने घडतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) बौद्धिक क्षमता वाढतील. नेतृत्व कराल. गायकांना उत्तम दिवस आहे. मेजवानी मिळेल. पत्नीची नाराजी जाणवेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक आवक वाढेल.  व्यापार वृद्धिंगत होईल. नात्यातून लाभ होतील. मन आनंदी करणारा दिवस आहे.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) शनीशी चंद्राचा केंद्र योग आहे. मोठी जोखीम घेऊ नका. गुंतवणूक टाळा. कर्जे घेऊ नका. खर्च वाढतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) प्रथम चंद्र शनीच्या आणि नंतर बुधाच्या नक्षत्रात असणार आहे. मन आनंदी राहील. आर्थिक लाभ होतील. वाहन सुख लाभेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) व्यय स्थानी चंद्र आहे. महत्वाची कामे आज नकोत. भिन्न लिंगी व्यक्ती कडून लाभ होतील. प्रवास घडतील. धाडस दाखवाल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) चंद्र अनुकूल आहे. आर्थिक लाभ होतील. स्वप्ने साकार होतील. महत्वाची कामे आज पूर्ण करा. प्रिय व्यक्तीला वेळ द्या

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक लाभ होतील. कलाकारांना यश मिळेल. कुटुंबाला वेळ द्याल. सामाजिक कामातून विनाकारण त्रास होऊ शकतात.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल ग्रहमान आहे. आज कामे पूर्ण करा. अर्थलाभ होईल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. पत्नीसाठी वेळ द्याल.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.