आजचे राशिभविष्य बुधवार,१२ जून २०२४ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
जेष्ठ शुक्ल षष्ठी. 
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३० 
“आज चांगला दिवस आहे” 
नक्षत्र – मघा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – सिंह.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) राशीस्वामीशी चंद्राचा शुभ योग आहे. शेअर्स मध्ये लाभ मिळतील.कार्यकुशलता वाढेल.न्यायी व्हाल.दबदबा वाढेल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) जुनी गुंतवणूक कामी येईल. कष्टाचा चांगला मोबदला मिळेल. वास्तू संबंधीत काही प्रश्न निर्माण होतील.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल चंद्र – मंगळ योग अफाट यश देईन. आर्थिक बाजू मजबूत होईल. सहकार्य मिळेल. शत्रू पराभूत होतील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) नोकरीच्या ठिकाणी झालेल्या ओळखीचा लाभ मिळेल. घरगुती बाबीत मार्ग निघेल. धनवृद्धी होईल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) तुमच्याच राशीत चंद्र आहे. उद्योग व्यवसायात भरघोस वाढ होईल. नेतृत्व कराल. प्रशंसा होईल. नोकरीच्या ठिकाणी काहीसे उदास वाटेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. अचानक लाभ होतील. आरोग्याची काळजी घ्या. पत्नीची चिंता वाटेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल ग्रहमान आहे. कोर्ट कामात यश मिळेल. शत्रूचा नायनाट होईल. व्यापार वाढेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) सरकारी कामात लाभ मिळतील. अडचणी दूर होतील. मतभिन्नता वाढू देऊ नका. चोरीचे भय आहे.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) बुद्धिमता वाखाणली जाईल. लॉटरी लागण्याची शक्यता आहे. भाग्योदय होईल. लक्ष्मी प्रसन्न राहील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे. स्थावर जमीन व्यवहारातून लाभ होतील. मालमत्ता वाढेल. संततीबाबत चिंता वाटेल.

कुंभ:– (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) ज्याच्यावर विश्वास नव्हता त्यांच्याचकडून लाभ मिळतील. भावंड मदत करतील. छोटे प्रवास घडतील.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आर्थिक उलाढाल वाढेल. लाभ होतील. मात्र उधारी देखील वाढणार आहे. रत्ने खरेदी होईल.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.