आजचे राशिभविष्य बुधवार,२८ ऑगस्ट २०२४ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
श्रावण कृष्ण दशमी
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३० 
“आज दुपारी १.०० पर्यंत चांगला दिवस आहे”घबाड दुपारी ३.५३ पर्यंत. 
नक्षत्र – मृग/ (दुपारी ३.५३ नंतर ) आर्द्रा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मिथुन.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) सुख आणि समाधान प्रदान करणारा दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. सूर्याशी शुभ योग आहे. कीर्ती पसरेल. नावलौकिक वाढेल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) मौल्यवान खरेदी होईल. आनंदी राहाल. कलाकारांना यश मिळेल. पाण्यापासून काळजी घ्या. प्रेमात अपयश संभवते.संयम ठेवावा लागेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आवडती वस्तू खरेदी कराल. कला प्रांतात उत्तम नावलौकिक होईल. प्रसन्न सूर्यदेव सर्व स्वप्ने साकार करतील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उत्तम दिवस आहे. आनंदी कालावधी आहे. अनुकूल चंद्र रवी योग नावलौकिक आणि सरकार दरबारी वजन वाढवतील. कामे मार्गी लागतील. मौल्यवान वस्तू मात्र सांभाळा.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) प्रगतीची घोडदौड चालू राहील.विशेष कामात यश मिळेल.सामाजिक महत्व वाढेल.तुम्ही स्तुतीप्रिय आहात.त्याबाबतीत आज समाधानी व्हाल.घशाचा त्रास होऊ शकतो.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल दिवस आहे. व्यवसायात वाढ होईल. भौतिक सुखे प्राप्त होतील. समाधानी राहाल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र ग्रहमान आहे. धन -संपत्ती वाढेल. खरेदी होईल.ज्ञानपिपासा वाढीस लागेल.गूढ बाबींची आवड निर्माण होईल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र ग्रहमान आहे.अष्टम स्थानी चंद्र आहे.आध्यात्मिक लाभ होतील.धर्म कार्य कराल.सूर्य उपसना करा.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) सामाजिक संबंध मजबूत होतील.नवनवीन योजना पार पडतील.आर्थिक नियोजन कराल.धाडसी निर्णय घ्याल.कामात सातत्य राखाल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल दिवस आहे.अनुकूल व्यक्तीची भेट घडेल.आर्थिक चिंता सतावतील.मन अस्वस्थ राहील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) संमिश्र दिवस आहे.मनन आणि चिंतन करण्यास अनुकूल कालावधी आहे.अंतर्मुख व्हाल.अनुकूल शुक्र धनलाभ देईन.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल ग्रहमान आहे.आध्यात्मिक प्रगतीस उत्तम कालावधी आहे.विजयी घोडदौड चालूच राहील.कोर्टात यश मिळेल.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!