आजचे राशिभविष्य बुधवार,७ ऑगस्ट २०२४  

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
श्रावण शुक्ल तृतीया. 
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३० 
“आज उत्तम दिवस आहे” 
नक्षत्र – पूर्वा (फाल्गुना)/उत्तरा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – सिंह.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)  चंद्राचा गुरुशी केंद्र योग तर शनी शी प्रतियोग आहे. संततीशी वाद संभवतात. शिक्षणात अडथळे जाणवतील. शेअर्स मध्ये नुकसान संभवते.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आध्यात्मिक लाभ होतील. दानधर्म कराल. वास्तू संबंधीत प्रश्न सुटतील. नवीन करार होतील.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) सरकारी कामे पूर्ण होतील. कामाचा वेग वाढेल. भावंड मदत करतील. विनाकारण भय दाटून येईल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) प्रशासकीय कामे पार पडतील. मान संम मिळतील. चांगल्या विचारांचे चांगले परिणाम जाणवतील. स्वप्नाळू व्हाल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) तुमच्याच राशीत चंद्र आहे. उद्योग व्यवसायात भरघोस वाढ होईल. नोकरीच्या ठिकाणी उत्तम यश लाभेल.  अधिकार वाढतील.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. अधार्मिक कामे होणार नाहीत याची काळजी घ्या. आरोग्य सांभाळा.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल ग्रहमान आहे. व्यावसायिक कामात यश मिळेल. शत्रूचा नायनाट होईल. वरिष्ठ  खुश होतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) सरकारी कामात लाभ मिळतील. अडचणी दूर होतील. नवीन व्यवसाय मिळेल. घरापासून दूर जावे लागेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अर्थलाभ होईल. खर्च देखील वाढेल.  लक्ष्मी प्रसन्न राहील. सामाजिक कामातून प्रतिष्ठा मिळेल. हाताची काळजी घ्या.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे. मन अस्वस्थ राहील. दानधर्म केल्यास उत्तम फळ मिळेल. संततीस चांगला कालावधी आहे. त्यांना सरकारी नोकरीचे योग येतील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) सप्तम चंद्राचा शनिशी प्रतियोग आहे. गुप्त शत्रू डोके वर काढतील. अधिक कष्ट करावे लागतील. श्री हनुमानाची उपासना करा.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आर्थिक उलाढाल वाढेल. लाभ  होतील. मात्र खर्च देखील वाढणार आहेत. देणी द्यावीच लागतील. वेळेत देऊन टाका.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.