आजचे राशिभविष्य बुधवार,२६ जून २०२४ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
ज्येष्ठ कृष्ण पंचमी. वर्षा ऋतू. 
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३० 
“आज उत्तम दिवस दिवस आहे” 
नक्षत्र – धनिष्ठा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी –  कुंभ.   
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)  अनुकूल चंद्र आहे. बौद्धिक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी कराल. वक्तृत्व चमकेल. प्रगती होईल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) दशम स्थानी चंद्र आहे. तुमचा दबदबा वाढेल मात्र नोकरीच्या ठिकाणी संयम ठेवा. अचानक एखादे जबाबदारीचे काम अंगावर येऊ शकते.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) दिवस चांगला आहे. सुरुवात संथ असली तरी नंतर मनासारख्या घटना घडतील. मौल्यवान वस्तू सांभाळा. आत्मविश्वास वाढेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र ग्रहमान आहे.  वेळेत कामे पूर्ण करा. नोकरीत तुमचा वरचष्मा राहील. स्पर्धेत यश मिळेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूल दिवस आहे. भाग्योदय होईल. सिद्धी प्राप्त होतील. प्रिय व्यक्ती भेटतील. आर्थिक लाभ होतील.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अर्थकारण मजबूत होईल. नवीन जागा  खरेदीचे करार होऊ शकतात. नोकरी/ व्यवसायात उत्कर्ष होईल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) सहलीचा आनंद घ्याल. अर्थलाभ होईल. मात्र काही चुकीचे निर्णय होवू शकतात. शेअर्स मध्ये सावधानता बाळगा.

वृश्चिक:– (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) कितीही स्पर्धा असली तरी आज तुमचा विजय निश्चित आहे. व्यवसाय वृद्धी होईल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) दिवसाचा पूर्वार्ध चांगला आहे. मनासारखी कामे होतील. जोडीदाराची नाराजी दूर करावी लागेल. तीव्र स्पर्धा जाणवेल.

मकर:– (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) प्रगतीची घोडदौड चालू राहील. आत्मविश्वास वाढेल. नवीन संधी चालून येतील. जमीन व्यवहारातून लाभ होतील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) तुमच्याच राशीत चंद्र आहे. सूर्याशी शुभ योग आहे. अत्यंत अनुकूल ग्रहमान आहे. वेळ दवडू नका.  अकल्पित लाभ होतील.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. कठोर पावले उचलाल. हातशपणा दूर होईल. व्यापारात यश मिळेल मात्र खर्च वाढेल.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.