आजचे राशिभविष्य बुधवार,५ जून २०२४  

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
वैशाख कृष्ण चतुर्दशी. ग्रीष्म ऋतू. 
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३० 
“आज वर्ज्य दिवस आहे” 
नक्षत्र – कृतिका. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृषभ.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) धन स्थानात बुध आणि गुरुषी चंद्राची युती आहे. आर्थिक लाभ होतील. येणी वसूल होतील. बोलल्याप्रमाणे कामे होतील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कामाचा झपाटा वाढेल. मन प्रसन्न राहील. नैतिक कामाना बळ मिळेल. बुद्धीचातुर्य दाखवाल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) व्यय स्थानात चंद्र आहे. दानधर्माचे उत्तम फळ मिळेल. आध्यात्मिक उन्नती होईल. नवीन खरेदी होईल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अत्यंत अनुकूल दिवस आहे. वेळेचे महत्व ओळखा. नोकरी/व्यवसायात भरघोस वाढ होईल. सरकारी कामे मार्गी लागतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) बढती/बदलीचे योग आहेत. वरिष्ठ खुश राहतील. मनासारखे काम होईल. सन्मान मिळतील.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आयुष्याचा मनमुराद आनंद घ्याल. अर्थलाभ होईल. तीर्थाटन घडेल. पित्याचे शुभ आशीर्वाद मिळतील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अष्टम स्थानी चंद्र आहे. नवीन खरेदी होईल. स्त्रीधन वाढेल. गुप्त किंवा हरवलेल्या वस्तू सापडतील. गूढ उलगडतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) भागीदारी व्यवसायात नवीन संधी मिळतील. नवी गणिते जुळतील. त्यातून लाभ होतील. पत्नीचा सल्ला मोलाचा ठरेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) नवीन सकाळ अनुभवाल. आरोग्याबाबत सजग व्हाल. अधिकारात वाढ होईल. त्यातून लाभ होतील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) सौख्य लाभेल. आनंदी राहाल. संतती बाबत खुश खबर मिळेल. छोटी सहल घडेल.

कुंभ:– (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) जमीन जुमल्या चे प्रश्न सुटतील. विहीर, पाणी याबाबतीत लाभ मिळतील. ऐश्वर्य लाभेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) छंद जोपासले जातील. अर्थकारण मजबूत होईल. प्रगती होईल. योग्य उपदेश मिळेल.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.