आजचे राशिभविष्य बुधवार,८ मे २०२४ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
चैत्र अमावस्या. ग्रीष्म ऋतू. 
राहुकाळ -दुपारी १२.०० ते दुपारी १.३० 
“आज अमावस्या, वर्ज्य दिवस आहे” गुरू पश्चिम लोप.
नक्षत्र – भरणी/कृतिका. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मेष/ (संध्याकाळ ७.०७ नंतर) वृषभ.   
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) तुमच्या राशीत रवी आणि हर्षल शी चंद्राची युती आहे. काही अनपेक्षित घटना घडतील. आत्मविश्वास वाढेल. अनुकूल शनी सर्व स्वप्ने साकार करतील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. मन प्रसन्न राहील. व्यय स्थानी चंद्र रवी युती आहे. सरकारी कामात अडथळे येऊ शकतात. कायद्याने वागणे हिताचे आहे.

मिथुन:– (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अत्यंत अनुकूल डायस आहे. लाभ स्थानी रवी, चंद्र, हर्षल आहेत. काहीही कमी पडणार नाही. सन्मान होईल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) दशम स्थानी बलवान ग्रह आहेत. नोकरीत मनासारख्या घटना घडतील. अधिकार वाढतील. अनुकूल चंद्र – गुरू योग प्रसन्नता देईल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) जेष्ठ व्यक्तीकडून लाभ होतील. परदेश प्रवास घडेल. उच्च शिक्षणात यश मिळेल. नोकरीत शुभ घटना घडतील.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. हरवलेली वस्तू सापडेल. अचानक लाभ होतील. लॉटरीत यश मिळू शकते. प्रवास घडतील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल दिवस आहे. शत्रू नामोहरम होतील. कोर्टात यश मिळेल. भागीदारी व्यवसायात यश मिळेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) विजयी घोडदौड चालू राहील. यशस्वी व्हाल. आर्थिक लाभ होतील. अचानक एखादा लाभ होऊ शकतो.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) सध्या काहीशी पीछेहाट जाणवत आहे. मात्र लवकरच परिस्थिती बदलेल. शेअर्स मध्ये फायदा होऊ शकतो.

मकर:– (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) मानसिक सौख्य लाभेल. मार्ग सापडेल. पुढील दिशा स्पष्ट होईल. संतती कडून खुश खबर मिळेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) गुरुची नाराजी असली तरी सूर्य देव सौख्य प्रदान करतील. यश मिळेल. शौर्य दाखवाल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आर्थिक आवक झाली तरी काहीसे अनामिक भय दाटून राहील. मन अस्वस्थ राहील.

(कुंडलीवरून करियर,लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.