आजचे राशिभविष्य बुधवार,१६ ऑक्टोबर २०२४  

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
अश्विन चतुर्दशी/पौर्णिमा. क्रोधी नाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३० 
“आज उत्तम दिवस आहे”  *कोजागिरी पौर्णिमा*  
नक्षत्र – उत्तराभाद्रपदा. (रात्री ७.१८ नंतर ) रेवती. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मीन.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) व्यय स्थानी पौर्णिमा आहे. नवीन संधी चालून येतील. मात्र एक गव्हाचा दान पेरल्याशिवाय हजारो दाणे मिळत नाहीत. खर्च करावा लागेल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो)  अनुकूल पौर्णिमा आहे. आनंदी राहाल. कलाकारांना यश मिळेल. स्वप्न साकार होतील. आनंदी राहाल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) कला प्रांतात उत्तम नावलौकिक होईल. प्रसन्न ग्रहमान सर्व स्वप्ने साकार करतील. नोकरीत सुखद अनुभव येतील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आनंदी कालावधी आहे. अनुकूल चंद्र रवी योग नावलौकिक आणि सरकार दरबारी वजन वाढवतील. कामे मार्गी लागतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे)  संमिश्र दिवस आहे. घरातील जेष्ठ व्यक्तीची काळजी घ्या. मौल्यवान वस्तू सांभाळा.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो)   व्यवसायात वाढ होईल. भौतिक सुखे प्राप्त होतील. समाधानी राहाल. सहकार्य मिळेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र ग्रहमान आहे. ज्ञानपिपासा वाढीस लागेल. आर्थिक प्रगती होईल. संधी प्राप्त होतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अनुकूल ग्रहमान आहे. पंचम स्थानी चंद्र आहे. आध्यात्मिक लाभ होतील. धर्म कार्य कराल. अचानक लाभ होतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) सामाजिक संबंध मजबूत होतील. नवनवीन योजना पार पडतील. सन्मान मिळतील. धाडसी निर्णय घ्याल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आर्थिक प्रगती साध्य होईल. येणी वसूल होतील. आर्थिक चिंता मिटतील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) तुमचं द्वितीया स्थानी पौर्णिमा आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. व्यवसायाच्या नवीन संधी प्राप्त होतील. क्षितिजे उंचावतील.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) तुमच्याच राशीत चंद्र आहे. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. आध्यात्मिक प्रगतीस अनुकूल कालावधी आहे.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.