आजचे राशिभविष्य शनिवार,२९ जून २०२४ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
ज्येष्ठ कृष्ण अष्टमी/नवमी. वर्षा ऋतू,
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज चांगला दिवस आहे”  
नक्षत्र: उत्तरा भाद्रपद. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी- मीन. 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) तुमच्या राशी स्वामींचा शुक्राशी लाभ योग आहे. मन प्रसन्न राहील. खरेदी होईल. महिलांना अलंकार आणि आभूषणे मिळतील.

वृषभ:– (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) अत्यंत अनुकूल दिवस आहे. सर्व महत्वाची कामे आज पूर्ण करा. कलाकारांना मोठे यश लाभेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल ग्रहमान आहे. कामे मनासारखी होतील. नोकरीच्या ठिकाणी चांगले अनुभव येतील. खर्च वाढले तरी आनंद देखील वाढेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अत्यंत अनुकूल दिवस आहे. सर्च शुभ ग्रहांचे संमेलन भरले आहे. स्वप्ने साकार होतील. संधीचे सोने करा.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. नोकरीच्या ठिकाणी काम करणाऱ्यांना भेटवस्तू किंवा मेजवानी द्याल. सरकारी कामाना गती प्राप्त होईल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उत्तम ग्रहमान आहे. तीर्थयात्रा घडेल. सरकारी कामे मार्गी लागतील. वाहन सौख्य लाभेल. प्रिय व्यक्ती भेटेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल दिवस आहे. काही सुखद घटना घडतील. स्त्रीधन वाढेल. भेटवस्तू मिळतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) उत्तम दिवस आहे. सर्वच क्षेत्रात प्रगती अनुभवला येईल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. व्यवसाय वाढेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र दिवस आहे. चांगले अनुभव येतील. हरवलेली वस्तू सापडेल. घरगुती कामे पूर्ण होतील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल दिवस आहे. अर्थप्राप्ती होईल. व्यवसायात यश मिळेल. संतती कडून चांगली बातमी समजेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. त्यातून लाभ होतील. वाहन सुख लाभेल. कौटुंबिक सौख्य मिळेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल दिवस आहे. चंद्राचा शुभ योग् आहे. अनेकोत्तम कामे पार पडतील. मित्रांची सहमती वाढेल.

(कुंडलीवरून करियर,लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521) 

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.