कार्तिक शुक्ल प्रतिपदा शरद ऋतू,दक्षिणायन.
राहुकाळ – दुपारी ४.३१ ते ५.५४
नक्षत्र: कृतिका
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आज तुमच्याच राशीत चंद्र आणि गुरू युती आहे. विशेष लाभदायक दिवस आहे. आध्यात्मिक लाभ होतील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) सप्तमतील मंगळाचा शनिशी केंद्र योग आहे. शत्रू शरजोर होतील. कोर्ट कामात अपयश संभवते.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्तम दिवस आहे. गूढ उलगडतील. सत्संग घडेल. आर्थिक तरतूद होईल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कामाच्या ठिकाणी मन रमेल. वरिष्ठ खुश राहतील. मनासारखी कामे होतील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) लक्ष्मीची कृपा बरसेल. उच्च शिक्षणात यश मिळेल. प्रवास घडतील. गृहकलह टाळा.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. मोठे निर्णय आज नकोत. आध्यात्मिक लाभ होतील.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कष्टाचे चीज होईल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल. कठोर बोलणे टाळा. जामीन राहू नका.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) सकारात्मक धोरण राबवा. कोणासही कमी लेखू नका. क्रोधावर नियंत्रण ठेवा.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल. आर्थिक बाजू भक्कम होईल. संतती बाबत शुभ समाचार समजेल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) मन अस्वथ राहील ,विचारपूर्वक निर्णय घ्या, घरातील वादविवाद टाळा
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक आवक चांगली राहणार आहे.दीर्घकालीन नफ्याचे करार होतील.मात्र काही व्यवसायीक अडचणी उदभवू शकतात.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) कौटुंबीक सौख्य लाभेल.धनवृद्धी होईल.स्थावर संपत्तीत भर पडेल.