आजचे राशिभविष्य गुरूवार,१६ मे २०२४

१६ मे रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
वैशाख शुक्ल अष्टमी/नवमी. ग्रीष्म ऋतू.क्रोधीनाम संवत्सर.  
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज चांगला दिवस आहे”  
चंद्र नक्षत्र – मघा/पूर्वा . 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – सिंह.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) विनम्रता कामी येईल. कार्यकुशलता दिसून येईल. न्याय मिळेल. परदेशगमन घडेल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) विवेकाने काम केल्यास आज यश मिळेल. स्थावर प्रश्न सुटतील. वाहन सुख मिळेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आर्थिक आवक चांगली होईल. बौद्धिक क्षेत्र चमकाल. शौर्य गाजवाल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो)  महत्वाची कामे पूर्ण करा.  कार्तिक चिंता मिटतील. उधारी मात्र वाढेल. इच्छापूर्ती होईल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) तुमच्याच राशीत चंद्र आहे. मन प्रसन्न राहील. नातेवाईक भेटतील. आरोग्य सुधारेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) प्रतिकूल दिवस आहे. खर्च वाढतील. विनाकारण वाद होतील. मावशी/मामाची काळजी वाटेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल दिवस आहे. व्यापारात यश लाभेल. खरेदी होईल. दागिने मिळतील. ऐश्वर्य लाभेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  नोकरीच्या ठिकाणी चांगले अनुभव येतील. वेळ द्यावा लागेल. मात्र पत्नी नाराज होऊ शकते.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) राजकारणात यश लाभेल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. प्रवास घडतील. मतभेद मिटतील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे. महत्वाची कामे आज नकोत. अष्टम स्थानी चंद्र आहे. गुप्त/हरवलेले धन सापडू शकते.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा)  अनोळखी इसमा कडून लाभ होतील. व्यापार वाढतील. स्पर्धक पराभूत होतील. चोरीचे भय आहे.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अर्थकारण मजबूत होईल. नात्यातून  मदत मिळेल. नवीन ओळखी होतील.

१६ मे रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर नेपच्यून, बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे.तुमचा स्वभाव विनोदी असून तुम्ही मनाने उदार आहात. तुमची प्रकृती वरचेवर खराब होत असते. वरून शांत दिसत असले तरी मनातून अस्वस्थ असतात. विवाहात न्यूनता जाणवते. इतरांची लुडबुड तुम्हाला सहन होत नाही. तुम्ही नम्र आहात मात्र रागीट पणा कधीकधी वाढतो. रहस्यकथा आणि विनोदी चित्रपट आवडतात.तुम्ही अभयसू आणि हुशार आहात.

आयुष्य आरामदायक असावे असे तुम्हाला वाटते. इतरांच्या सुख दुःखांचा तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करतात. अनेकदा तुम्ही निराश होतात. बारीक सारीक गोष्टी तुमच्या लक्षात राहतात. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी आहे. वागण्यात सावधगिरी असते.  तुमची महत्त्वाकांक्षा, तुमची स्वप्ने अत्यंत उच्च प्रतीचे असतात. जुन्या परंपरा आणि रुढी तुम्हाला फारशा आवडत नाहीत. तुम्ही कायम अस्वस्थ असतात. एकाच वेळी तुमची दोलायमान मनस्थिती असते.

स्वतःला ताकदवान आणि त्याच वेळी मनाने कमकुवत देखील समजतात. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी आहे. तुमचे विचार तुम्ही इतरांना चांगल्या प्रकारे समजून सांगू शकतात. कला-क्रीडा, प्रवास यांचे तुम्हाला आवड आहे. तुम्ही उत्साही असून तुम्हाला आळशीपणा आवडत नाही. तुम्ही तर्कशुद्ध विचार करू शकतात. परदेशाबद्दल तुम्हाला विशेष आकर्षण असते. शक्यतो उच्च वर्तुळात तुम्ही वावरतात.

पुस्तक वाचण्या मध्ये वेळ घालवणे तुम्हाला जास्त प्रिय असते. तुम्हाला स्वतःच्या अधिकाराची तसेच बुद्धिमत्तेची जाणीव आहे. तुम्ही चिकित्सक आहात. चटकन कोणावर विश्वास ठेवत नाहीत. तुम्ही आयुष्यातले प्रश्न संयमाने हाताळतात. तुम्हाला हाती घेतलेल्या कार्यात यश मिळते.तुम्ही व्यापारी वृत्तीचे आहात.

व्यवसाय:- आयात-निर्यात, खरेदी-विक्री, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, साबण, केमिकल, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिक.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार, बुधवार.
शुभ रंग:-  पांढरा.
शुभ रत्न:- पाचू, मोती, लसण्या.

(कुंडलीवरून करियर,लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521) 

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.