आजचे राशिभविष्य शनिवार,४ नोव्हेंबर २०२३

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
अश्विन कृष्ण षष्ठी. शरद ऋतू, दक्षिणायन.
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज दुपारी १२.०० नंतर चांगला दिवस आहे”
नक्षत्र: पुनर्वसू/पुष्य.
आज जन्मलेल्या बाळाची राशी- कर्क.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) हर्षल ची बुधाशी प्रतियुती आहे. विरोधक प्रबळ होतील. कोर्ट कामात अपयश संभवते. मौल्यवान वस्तू सांभाळा.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) सुदृढ आर्थिक स्थितीची जाणीव होईल. नवीन घराचे स्वप्न साकार होईल. खर्च वाढेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अचूक अंदाज येतील. अचानक लाभाचे प्रसंग येतील मात्र एखादी अप्रिय घटना घडू शकते.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) तुमच्या क्षेत्रात कॊनी अतिक्रमण करणार नाही याची काळजी घ्या. स्पर्धा जाणवेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) प्रतिकूल दिवस आहे. काळजी घेणे आवश्यक आहे. मोठे नुकसान घडू शकते.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उत्तम दिवस आहे. खरेदी होईल. व्यावसायिक वृद्धी होईल. नवीन ओळखी होतील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) नोकरी/व्यवसायत वृद्धी होईल. जुने वरिष्ठ जाऊन नवीन येऊ शकतात. बदल जाणवेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) पर्यटन घडेल. नवीन प्रदेश बघण्यास मिळेल. एखाद्या गोष्टीचा ध्यास घ्याल. सातत्य राखावे लागेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) फारसा अनुकूल दिवस नाही. अधिक मेहनत घ्यावी लागेल. शेअर्स मधून मोठे नुकसान संभवते.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) यशस्वी कारकीर्द देणारा दिवस आहे. भ्रमंती घडेल. प्रवासात काळजी घ्या. वीज आणि आगीपासून सावध रहा.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक बाजू भक्कम होईल. नवीन ग्राहक मिळतील. मात्र प्रवासात त्रास संवभतो. काळजी घ्या.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. बोलण्यातून गैरसमज होऊ शकतात. कागदपत्रे काळजीपूर्वक तपासून घ्या.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.